Amravati: ४८ वर्षीय महिलेच्या गर्भाशयातून काढला २ किलोचा फाइब्रॉएड, डॉ. राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालयाने केली शस्त्रक्रिया यशस्वी

By उज्वल भालेकर | Published: July 6, 2024 07:41 PM2024-07-06T19:41:34+5:302024-07-06T19:42:06+5:30

Amravati News: डॉ राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व रुग्णालयाच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागाने एका ४८ वर्षीय महिलेवर शस्त्रक्रिया करून तिच्या गर्भाशायातून २ किलो वजनाचा फाइब्रॉएड यशस्वीरीत्या काढण्यात आले आहे. या शस्त्रक्रियेमुळे सदर महिलेला जीवनदान मिळाले आहे.

Amravati: A 2 kg fibroid was removed from the uterus of a 48-year-old woman, Dr. Surgery performed by Rajendra Gode Medical College was successful | Amravati: ४८ वर्षीय महिलेच्या गर्भाशयातून काढला २ किलोचा फाइब्रॉएड, डॉ. राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालयाने केली शस्त्रक्रिया यशस्वी

Amravati: ४८ वर्षीय महिलेच्या गर्भाशयातून काढला २ किलोचा फाइब्रॉएड, डॉ. राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालयाने केली शस्त्रक्रिया यशस्वी

- उज्वल भालेकर  
अमरावती - डॉ राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व रुग्णालयाच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागाने एका ४८ वर्षीय महिलेवर शस्त्रक्रिया करून तिच्या गर्भाशायातून २ किलो वजनाचा फाइब्रॉएड यशस्वीरीत्या काढण्यात आले आहे. या शस्त्रक्रियेमुळे सदर महिलेला जीवनदान मिळाले आहे.

मागील तीन वर्षापासून ४८ वर्षीय महिलेच्या ओटीपोटात दुखत होते. नियमित स्कॅनमध्ये असे दिसून आले की रुग्णाला ३० आठवाड्याच्या ग्रॅव्हिड गर्भाशयाच्या समतूल्य फाइब्रॉएड आहे . यापूर्वी तिची तीन सिझेरियन शस्त्रक्रिया झाली होती. गर्भाशयाचा फाइब्रॉएड हा एक सामान्य गैर- कर्करोग ट्यूमर आहे. जो सामन्यातः १५ ते ४५ वर्षाच्या प्रजनन वयोगटातील महिलांमध्ये आढळतो. त्याचा प्रसार २० ते ४० टक्के इतका जास्त आहे. हा ट्यूमर सहसा लक्षणे नसलेले असतात आणि बहुतेक वेळा क्लिनिकल तपासणी किंवा सोनोग्राफीमध्ये योगायोगाने आढळतात. जेव्हा लक्षणे आढळतात तेव्हा ते जास्त मासिक पाळीत रक्तस्राव, ओटीपोटात वेदना, आतड्यासंबंधी बिघडलेले कार्य दर्शवते तथापि गर्भाशयात एवढा मोठा फाइब्रॉएड होण्याची घटना दुर्मिळ आहे.

महिलेच्या पोटात फाइब्रॉएड आणि गर्भाशयाचा आकार पाहता डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. दोन किलो फाइब्रॉएड बरोबरच महिलेची गर्भपिशवी काढून ( हिस्टेरेक्टोमी ) प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दोन तास चाललेली ही जटिल शस्त्रक्रिया डॉ. लक्ष्मी डेहनकर यांनी केली. या शस्त्रक्रियेत डॉ. स्नेहा जावळकर, डॉ. देविका भिवगडे, डॉ. अल्का कुथे. डॉ. नितिन अलसपूरकर यांनी सहकार्य केले. डॉ. राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अध्यक्ष योगेंद्र गोडे, सचिव तन्वी गोडे, सीईओ डॉ. योगेश गोडे, डीन डॉ. नारायण उमाळे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीरज मुरके यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

Web Title: Amravati: A 2 kg fibroid was removed from the uterus of a 48-year-old woman, Dr. Surgery performed by Rajendra Gode Medical College was successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.