ऑटोरिक्षा कारचा अपघात, पोलिस निरीक्षकाच्या कारवर धडकला; चार जण जखमी
By सुरेंद्र राऊत | Updated: March 17, 2024 15:59 IST2024-03-17T15:58:06+5:302024-03-17T15:59:29+5:30
वसंत नगर येथील ठाणेदार नंदकुमार पंत त्याच्या खासगी कारने यवतमाळकडे येत असताना आर्णी मार्गावर अजुर्ना घाटात भरधाव ऑटाेरिक्षा कारवर धडकला.

ऑटोरिक्षा कारचा अपघात, पोलिस निरीक्षकाच्या कारवर धडकला; चार जण जखमी
यवतमाळ : वसंत नगर येथील ठाणेदार नंदकुमार पंत त्याच्या खासगी कारने यवतमाळकडे येत असताना आर्णी मार्गावर अजुर्ना घाटात भरधाव ऑटाेरिक्षा कारवर धडकला. यात ऑटाेतील चार जण जखमी झाले आहे. हा अपघात रविवारी दुपारी घडला. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नंदकूमार पंत हे त्याची कार क्रं. (एमएच २९ एआर ०६८६) ने यवतमाळकडे येत असताना अर्जूना घाटात ऑटाेरिक्षा विरूध्द दिशेने येत हाेता. पंत हे ट्रकला ओव्हर टेक करत असताना वनवे मार्गावर विरूध्द दिशेने ऑटाे आला. यातच कारची थेट ऑटाेला धडक बसली. यात ऑटाेरिक्षातील चार प्रवासी जखमी झाले. ते सर्व बाेथबाेडण येथे जात हाेते.
आर्णी महागमार्गावर वाहतुक नियम पाळले जात नाही. दुरून वळण घ्याव लागते म्हणून ऑटाेरिक्षा व इतर प्रवासी वाहन चालक थेट विरूध्द दिशेने वाहन चालवितात. यातून या मार्गावर भिषण अपघात घडत आहेत. अनेक ठिकाणी तर रस्ता दुभाजकाला फाेडून वळन रस्ता तयार केलेा आहे. यामुळेही अपघात वाढले आहेत. काही दिवसापूर्वी जिल्हा पाेलिस अधिक्षक डाॅ. पवन बन्साेड यांच्या आदेशावून दुभाजक ताेडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले हाेते. त्यानंतर पुन्हा असा ड्राईव्ह झाला नाही.
राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथे वाहन चालविताना काटेकाेरपणे नियम पाळणे गरजेचे आहे. परंतु असे हाेताना दिसत नाही, त्यामुळे दुचाकस्वार व प्रवासी वाहन चालविणाऱ्यांकडून येथे सरार्स नियम माेडले जातात. यातूनच जीवघेणे अपघात हाेत आहेत.