अन् वृद्धांच्या अश्रूंना मिळाली मोकळी वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:22 AM2018-11-18T00:22:52+5:302018-11-18T00:23:24+5:30
त्यांचे आपुलकीचे शब्द, अन् मायेचा आधार मिळताच वृद्धांच्या चेहऱ्यावर हसू उमलले. आ आनंदात वृद्धांनी आपल्या आनंदाश्रूंना मोकळी वाट करून दिली.
राजेश कुशवाह ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : त्यांचे आपुलकीचे शब्द, अन् मायेचा आधार मिळताच वृद्धांच्या चेहऱ्यावर हसू उमलले. आ आनंदात वृद्धांनी आपल्या आनंदाश्रूंना मोकळी वाट करून दिली.
हा प्रसंग होता तालुक्यातील उमरी पठार येथील संत दोला महाराज वृद्धाश्रमातील. नुकतीच ८ नोव्हेंबरला वृद्धाश्रमाला लोकमत एडोटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांनी भेट दिली. त्यांनी खासदार असताना आपल्या विकास निधीमधून वृद्धाश्रमाला दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध दिला होता. त्यातून वृद्धाश्रमात सभागृह बांधकाम करण्यात आले. त्याचे लोकार्पण विजय दर्डा यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमाला उपस्थित विजय दर्डा यांनी आपल्या परिवारातील अनेक घटना विषद केल्या. वृद्धांशी आपलेपणाने हितगुज केले. त्यांच्याशी प्रेमळ संवाद साधला. आई-वडिलांच्या आशिवार्दानचे मी आज तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो, असे सांगितले. आई-वडिलांच्या आशीवार्दाने आणि संस्कारामुळेच खºया अर्थाने यावर्षीची दिवाळी तुमच्यासोबत आनंदाने साजरी करीत असल्याचे विजय दर्डा यांनी सांगितले.
याप्रसंगी विजय दर्डा यांनी बºयाच वर्षांनंतर मी माझ्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करीत असून त्याचा अतिव आनंद होतो आहे, असे सांगताच उपस्थित वृद्धांसह अनेक मान्यवरांना गहिवरून आले. खुद्द विजय दर्डा यांना राहावले गेले नाही. त्यांनी आपली मान्यवरांतील खुर्ची सोडून समोर बसलेल्या म्हाताºया आई-वडिलांमध्ये बैठक मारली. त्यांची आस्थेने विचारपूस केली. हा क्षण अत्यंत भाऊक होता. त्यामुळे वृद्धांनीही आपल्या आनंदाश्रूंना मोकळी वाट करुन दिली. ज्यांनी नाकारले, त्यांच्यापेक्षा परकेच आपले असल्याची भावना वृद्धांच्या चेहºयावर उमटली होती. हे क्षण कायमचे मनात कोरले गेले.
वृद्धाश्रमातील वृद्धांना जेवढी आर्थिक मदतीची गरज आहे तेवढीच किंबहुना त्यापेक्षाही अधिक मानसिक आधाराची गरज आहे. त्यामुळे संत दोला महाराज वृद्धाश्रमाला परिसरातील प्रत्येक तरुणाने भेट देऊन वृद्धांशी संवाद साधला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करताना विजय दर्डा यांनी स्वत: वृद्धांच्या गोतावळ्यात बसून संवाद साधला. त्यांच्या आपुलकीने वृद्धांच्या जगण्याला आणि वृद्ध सेवक शेषराव डोंगरे यांच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली. हा दिवस खुद्द विजय दर्डा यांच्यासाठीही अविस्मरणीय ठरला.