अंगणवाडीतार्इंची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 10:00 PM2017-09-13T22:00:06+5:302017-09-13T22:00:38+5:30
जिल्ह्यातील अंगणवाडीतार्इंनी बुधवारी जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी थाळी निदर्शने केली. गेल्या ११ सप्टेंबरपासून त्यांचा बेमुदत संप सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील अंगणवाडीतार्इंनी बुधवारी जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी थाळी निदर्शने केली. गेल्या ११ सप्टेंबरपासून त्यांचा बेमुदत संप सुरू आहे. बुधवारी त्यांनी जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद करून निदर्शने केली. यावेळी अंगणवाडीतार्इंनी राज्य आणि केंद्र शासनावर आसूड ओढणारे गीते सादर केली. सेविकांच्या मानधनात वाढ करावी, टीएचआर बंद करून लाभार्थिंना पर्यायी आहार देणे, पूरक पोषण आहाराच्या निधीत वाढ करणे, आदी मागण्या लावून धरल्या.
या मागण्यांसाठी राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी सध्या बेमुदत संपावर आहे. शासनाने मानधन वाढीसाठी समिती नेमली. समितीने अहवाल दिला. तरीही अद्याप मानधनात वाढ करण्यात आली नसल्याने कर्मचारी संतप्त आहे. आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी थाळी निदर्शने केली. यात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या कार्याध्यक्ष मंगला सराफ यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. नंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. आंदोलनात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या कार्याध्यक्ष मंगला सराफ, विजय सांगळे, ज्योती कुलकर्णी, राजू लोखंडे, हूकुमताई ठमके, सुषमा पांडे, माला क्षीरसागर, लिला काळे, माला नंदूरकर, गंगा वाघमारे, लता रेवडे, लता माटे, ज्योती येरेकार, चंदा लिंगनवार, सुशिल पळवेकर आदींचा सहभाग होता.