अंगणवाडी, बालवाडी तार्इंचा संप

By admin | Published: March 21, 2017 12:06 AM2017-03-21T00:06:18+5:302017-03-21T00:06:18+5:30

अंगणवाडीतार्इंनी मानधनवाढीच्या मागणीकरिता सोमवारपासून दोन दिवशीय राज्यव्यापी संप पुकारला आहे.

Anganwadi, kindergarten trench | अंगणवाडी, बालवाडी तार्इंचा संप

अंगणवाडी, बालवाडी तार्इंचा संप

Next

४० वर्षात चारदाच वाढ : पाँडेचरीत १६ हजार, महाराष्ट्रात ५ हजार
यवतमाळ : अंगणवाडीतार्इंनी मानधनवाढीच्या मागणीकरिता सोमवारपासून दोन दिवशीय राज्यव्यापी संप पुकारला आहे. आयटकच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी संघटना हे आंदोलन करीत आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील अंगणवाडीताई सहभागी झाल्या असून मानधन वेतनात रूपांतरित करण्याची मागणी केली आहे.
पाँडेचरीमध्ये अंगणवाडीताईला १६ हजार २०० रूपयांचे मानधन आहे. मात्र महाराष्ट्रात केवळ पाच हजार रूपये मानधन देण्यात येते. हा दुजाभाव का, असा सवाल करीत मानधन वाढविण्याची मागणी करण्यात आली. मानधन वेतनात रूपांतरित करण्याची विनंतीही करण्यात आली. गत ४० वर्षांत अंगणवाडीताईच्या मानधनात केवळ चार वेळा तोकडी वाढ केली आहे. एक महिन्याची उन्हाळी सुटी मंजूर करण्यात यावी, महागाई भत्ता, वार्षिक मानधनवाढ, पेमेंट आॅफ ग्रॅज्युईटी लागू करावी, प्रोव्हीडंट फंड अ‍ॅक्ट लागू करावा आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोेलनाचे नेतृत्व उषा डंभारे यांनी केले. यावेळी गुलाब उम्रतकर, पल्लवी रामटेके, रमा गजभार, सविता कट्यारमल, रेखा लांडे, अनिता जगताप, निर्र्मला मोहरकर आदी सहभागी होते. (शहर वार्ताहर)

Web Title: Anganwadi, kindergarten trench

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.