पांढरकवडात अंगणवाडीसेविकांनी केले मोबाइल परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:44 AM2021-08-26T04:44:30+5:302021-08-26T04:44:30+5:30
पांढरकवडा आयटक अध्यक्ष सुजाता चितकुंटलवार, ज्ञानेश्वरी शहारे, ममता मांडेकर, मीरा जिड्डेवार, अर्चना कुडमेथे, पार्वती पराते, लीला डेबलवार, शीला राऊत, ...
पांढरकवडा आयटक अध्यक्ष सुजाता चितकुंटलवार, ज्ञानेश्वरी शहारे, ममता मांडेकर, मीरा जिड्डेवार, अर्चना कुडमेथे, पार्वती पराते, लीला डेबलवार, शीला राऊत, सिंधू बोडेकर, मंगला गांजरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून, मोबाइल परत कण्यात आले. आयटक जिल्हा कार्याध्यक्ष दिवाकर नागपुरे, अंगणवाडी कर्मचारी युनियन जिल्हा अध्यक्ष सविता कट्यालमल, जिल्हा सचिव गया सावळकर यांनी मार्गदर्शन केले. केंद्र शासनाने जुना कॉमन एप्लिकेशन ॲप्स बंद करून, नवीन पोषण टॅकर ॲप्स दिलेला असून, तो सदोष आहे. सर्व माहिती इंग्रजी भरावी लागत आहे. महाराष्ट्रातील मातृभाषा मराठी असल्यामुळे पोषण टॅकर ॲप्स मराठीत करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. दिलेल्या मोबाइलची वॉरंटी संपली आहे, तसेच या मोबाइलमध्ये अनेक समस्या असून, अंगणवाडीसेविका त्रस्त झाल्या आहेत. त्यामुळेच मोबाइल परत करण्यात आले. यावेळी संगीता टेकाम, शोभा नारनवरे, नगिना नारनवरे, कविता वडते, स्वाती ठेंगणे, देवका नैताम, रेखा क्षीरसागर, शारदा आत्राम, ममता नामसेनवार, सोनू कुभरे, संगीता आत्राम, वर्षा राठोड, सुवर्णा गेडाम आदी उपस्थित होत्या.