संविधान जाळणाऱ्यांविरूद्ध संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 10:10 PM2018-08-11T22:10:43+5:302018-08-11T22:14:25+5:30
संविधान जाळण्यासोबतच विरोधी घोषणा देणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी यवतमाळ शहर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. तसेच नेर येथे ठाणेदारांना निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ/नेर : संविधान जाळण्यासोबतच विरोधी घोषणा देणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी यवतमाळ शहर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. तसेच नेर येथे ठाणेदारांना निवेदन देण्यात आले.
नवी दिल्ली येथे काही लोकांनी संविधानाच्या कलम १६ विरोधी घोषणा दिल्या. या प्रकाराने शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. मनुस्मृती जिंदाबाद, मनुस्मृती का कानून लागू करो आदी प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न या प्रकाराने झाला. याविषयी दोषींवर कारवाई करावी, अशी तक्रार यवतमाळ शहर पोलिसात देण्यात आली आहे.
विजय शेगेकर, कुंदा तोडकर, इंदू मोहर्लीकर, चंदा ढोके, चंदा खडसे, सारिका भगत, अर्चना कयापाक, संदीप मुने, बाळकृष्ण गेडाम, बुद्धराज दुपारे, सचिन चचाने, नारायण चामलाटे, रामचंद्र मरकाम, विलास गायकवाड, प्रशांत मोटघरे, पवन देवतळे आदींच्या स्वाक्षऱ्यांनिशी ही तक्रार देण्यात आली आहे.
नेर येथे भारत मुक्ती मोर्चाच्यावतीने ठाणेदार अनिल किनगे यांना निवेदन देण्यात आले. संविधान जाळणाऱ्या समाज कंटकांवर गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रीय मूल निवासी महिला संघ, राष्ट्रीय भटक्या विमुक्त मोर्चा, राष्ट्रीय विद्यार्थी सेना, राष्ट्रीय आदिवासी छात्रसंघ, भारतीय बौद्ध महासभा, मराठा सेवा संघ, अखिल भारतीय माळी महासंघ, अहल्यादेवी होळकर स्मारक समिती आदी संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.