वैद्यकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळे संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:46 AM2021-08-28T04:46:33+5:302021-08-28T04:46:33+5:30

फोटो फुलसावंगी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ.वैभव नखाते यांची बदली झाली. त्यांच्या बदलीमुळे येथील आरोग्यसेवा ...

Anger over the replacement of a medical officer | वैद्यकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळे संताप

वैद्यकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळे संताप

googlenewsNext

फोटो

फुलसावंगी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ.वैभव नखाते यांची बदली झाली. त्यांच्या बदलीमुळे येथील आरोग्यसेवा कोलमडून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. त्यांची बदली रद्द न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक बाह्यरुग्ण तपासणी व प्रसूती येथील आरोग्य केंद्रात होतात. महागावसह उमरखेड, किनवट व माहूर तालुक्यातील रुग्ण येथे येतात. आरोग्य केंद्रात तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असताना, मागील २ वर्षांपासून एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. त्यांचीही आता बदली झाल्याने आरोग्यसेवा कोलमडली आहे.

आरोग्य केंद्रात २ वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. मात्र, माता मृत्यू प्रकरणात एका आरोग्य अधिकाऱ्याला प्रतिनियुक्तीवर इतर ठिकाणी पाठविण्यात आले. त्यांना येथून कार्यमुक्त केले नसल्याने, येथे वैद्यकीय अधिकाऱ्याची जागा रिक्त दिसत नाही. मात्र, प्रत्यक्षात येथे एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्या बदलीचा फेरविचार करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे, अन्यथा जनआंदोलन पेटण्याची शक्यता आहे.

बॉक्स

शाळेतही अनेक जागा रिक्त

फुलसावंगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत आठ शिक्षक कार्यरत होते. प्रशासकीय बदलीत पाच शिक्षक येथून गेले. मात्र, नवीन एकही शिक्षक देण्यात आला नाही. त्यामुळे महागाव तालुक्यातील सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेली येथील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे, असे व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र पांढरे यांनी सांगितले.

कोट

प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त आहे. त्यामुळे शासनाने येथून जितक्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या, तितक्या कर्मचाऱ्यांच्या जागा प्रथम भरण्यात याव्यात, नंतरच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्या.

-शमशेर खान, सामाजिक कार्यकर्ता, फुलसावंगी.

Web Title: Anger over the replacement of a medical officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.