‘जेडीआयईटी’च्या अनिकेत इंगोलेचे संशोधनपत्र आंतरराष्ट्रीय विद्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 23:49 IST2018-08-24T23:49:07+5:302018-08-24T23:49:36+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अनिकेत इंगोले याचे संशोधनपत्र आंतरराष्ट्रीय विद्यालयात प्रसिद्ध झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कचरा समस्या, त्यावर घरगुती कचरा व्यवस्थापन आणि निर्मूलनयंत्र, असा त्याच्या संशोधनपत्राचा विषय होता.

‘जेडीआयईटी’च्या अनिकेत इंगोलेचे संशोधनपत्र आंतरराष्ट्रीय विद्यालयात
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अनिकेत इंगोले याचे संशोधनपत्र आंतरराष्ट्रीय विद्यालयात प्रसिद्ध झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कचरा समस्या, त्यावर घरगुती कचरा व्यवस्थापन आणि निर्मूलनयंत्र, असा त्याच्या संशोधनपत्राचा विषय होता.
थायलंडमध्ये इंटरनॅशनल सिव्हील आणि इन्व्हरमेंटल इंजिनिअरिंग कॉन्फरन्स घेण्यात आली. यात २५ देशातील वैज्ञानिक सहभागी झाले होते. यामधून अनिकेत इंगोले याचा प्रथम क्रमांक आला होता.
आता त्याचे संशोधनपत्र इंटरनॅशनल जर्नल आॅफ अॅडव्हाँस मेक्यानिकल अॅन्ड सिव्हील इंजिनिअरिंगमध्ये प्रसिद्ध झाले आहे. सदर जर्नल हे मॅसेचिव्ह सेट इंन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (जागतिक क्रमवारी-१), स्टँड फॉर युनिव्हर्सिटी, कँब्रेज युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी आॅफ मँचेस्टर या नामांकित विद्यापीठात प्रसिद्ध होणार आहे. अनिकेतच्या नावावर तीन पेटंट आहे.