जनावर तस्करीत आलिशान वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:32 PM2018-05-22T23:32:09+5:302018-05-22T23:32:09+5:30
कत्तलीसाठी जनावरे नेण्याकरिता आता आलिशान वाहनांचा वापर केला जात आहे. सोमवारी रात्री राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ वाहनातून ६ जनावरांची सुटका करण्यात आली. वडकी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडकी : कत्तलीसाठी जनावरे नेण्याकरिता आता आलिशान वाहनांचा वापर केला जात आहे. सोमवारी रात्री राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ वाहनातून ६ जनावरांची सुटका करण्यात आली. वडकी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून संशयित वस्तू पांढरकवडाकडे जात असल्याची माहिती पोलीस शुभम सोनुले यांना मिळाली. त्यावरून वाहन वडकी येथे थांबविण्याना प्रयत्न झाला. मात्र हे वाहन पळून गेले. जमादार राजू मोहूर्ले व पोलीस शुभम सोनुले यांनी पाठलाग केला. वेगात असलेले हे वाहन त्यांना सापडू शकले नाही. पुढे राष्ट्रीय महामार्ग पोलिसांच्या मदतीने पाठलाग सुरु केला. स्कॉर्पिओ उमरी गावात शिरली. वाहन चालक व सहकारी शेतात वाहन सोडून पळून गेले. पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. या स्कॉर्पिओमध्ये सहा जनावरे होती. अजहर खान अब्दुल्ला खान (२३) व अख्तर अहमद सत्तार अहमद कुरेशी (३०) दोघेही रा.नागपूर यांना ताब्यात घेतले. जनावरांचे पाय दोरीने बांधून वाहतूक केली जात होती. प्रकरणी उपनिरीक्षक दीपक काक्रेडवार यांच्या तक्रारीवरून कारवाई केली.