मारेगाव शहरात जनावरांच्या चोऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:31 AM2021-07-17T04:31:25+5:302021-07-17T04:31:25+5:30
मारेगाव येथील उपोषणाची सांगता मारेगाव : मारेगाव पोलिसांनी अवैध दारू विक्रीत विनाकारण अटकविले आणि अश्लील शिवीगाळ करीत अपमानास्पद वागणूक ...
मारेगाव येथील उपोषणाची सांगता
मारेगाव : मारेगाव पोलिसांनी अवैध दारू विक्रीत विनाकारण अटकविले आणि अश्लील शिवीगाळ करीत अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पोलिसांवर कार्यवाही करावी, या मागणीसाठी ५ जुलैपासून सीमा आफरोज खान ही महिला येथील पोलीस स्टेशनसमोर उपोषणाला बसली होती. दरम्यान, याप्रकरणी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी या महिलेचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून याप्रकरणी चौकशी करण्याचे सुचविले. आमदारांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.
महिला बचत गटांना कर्ज वाटप करा
मारेगाव : तालुक्यातील प्रत्येक गावात महिला बचत गट तयार केले आहेत; परंतु या बचत गटांना बँकांकडून योग्य प्रमाणात कर्ज पुरवठा होत नाही. त्यामुळे महिलांचे अनेक बचत गट आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यामुळे महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी
मारेगाव : शहराला जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या आजूबाजूला झुडपे वाढल्याने मार्ग व्यवस्थित दिसत नाही. अनेक ठिकाणी दिशादर्शक सूचना फलक गायब झाले आहे. त्यामुळे चालकांची गैरसोय होत असून वळण, नदी, नाला, पूल अपघातप्रवण क्षेत्रातील रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला आहे.