इम्तियाज हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड अंजूम खान पोलीस कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:42 AM2021-07-31T04:42:20+5:302021-07-31T04:42:20+5:30

फोटो इम्तियाज हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड अंजूम खानला ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, आतापर्यंत सातपैकी पाच आरोपी गजाआड, दोन आरोपींचा शोध ...

Anjum Khan, mastermind of Imtiaz murder case, in police custody | इम्तियाज हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड अंजूम खान पोलीस कोठडीत

इम्तियाज हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड अंजूम खान पोलीस कोठडीत

Next

फोटो

इम्तियाज हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड अंजूम खानला ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, आतापर्यंत सातपैकी पाच आरोपी गजाआड, दोन आरोपींचा शोध सुरू, वसंतनगर पोलीस स्टेशन, पुसद ( प्रा प्रकाश लामणे ) पुसद

पुसद : शहरातील गजबजलेल्या वाशिम रोडवर भरदिवसा गोळ्या झाडून इम्तियाज खान सरदार खान (२८) या तरुणाची निर्घृण हत्या झाली होती. या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड व मुख्य आरोपी अंजूम खान लियाकतअली खान (४४) रा. गढीवाॅर्ड, पुसद याला यवतमाळ येथून अटक करण्यात आली. त्याला ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

या प्रकरणात आतापर्यंत एकूण सातपैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. अद्याप दोन आरोपींचा वसंतनगर पोलीस शोध घेत आहे. पुसद येथे २५ जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास आरोपी अंजूम खान याच्या दोन साथीदारांनी दुचाकीवरून येत इम्तियाज खान याच्यावर भरदिवसा सहा गोळ्या झाडल्या होत्या. यात इम्तियाज जागीच ठार झाला होता. याप्रकरणी इम्तियाजचे वडील सरदार खान अमीरउल्ला खान पठाण यांच्या तक्रारीवरून वसंतनगर पोलिसांनी अंजूमसह एकूण सात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०२, १२० ब, १०९, ३४ आणि आर्म ॲक्ट ३/२५ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

एसडीपीओ अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात वसंतनगरचे ठाणेदार रवींद्र जेधे, शहरचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला आदींनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासांतच एका विधिसंघर्ष बालकासह दोन आरोपींना अटक केली होती. नंतर इम्तियाजवर देशी कट्ट्यातून गोळ्या झाडून दुचाकीवरून फरार झालेला सय्यद अस्लम सय्यद सलीम (२८) याला कळंब येथून तर २९ जुलै रोजी मास्टरमाइंड अंजूम खान (४४) याला यवतमाळ येथून जेरबंद केले होते. या दोघांनाही ४ ऑगस्टपर्यंत, तर शेख हाफिज व फैजल खान या दोघांना २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

बॉक्स

अफवांवर विश्वास ठेवू नका

या प्रकरणातील आणखी दोन आरोपी कमरखानम लियाकतअली खान (६२) आणि उस्मा शमीम अहेमद (२२) यांचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी तथा ठाणेदार रवींद्र जेधे यांनी दिली. सध्या परिस्थिती नियंत्रणात

असून या गोळीबार प्रकरणाचा उलगडा झाला आहे. आतापर्यंत पोलीस व एलसीबी पथकाने सातपैकी पाच आरोपींना अटक केली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, आपले व्यवहार सुरळीत सुरू ठेवावेत, असे आवाहन सहायक पोलीस अधीक्षक तथा एसडीपीओ अनुराग जैन यांनी केले आहे.

Web Title: Anjum Khan, mastermind of Imtiaz murder case, in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.