घाटंजी येथे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 10:07 PM2017-10-04T22:07:53+5:302017-10-04T22:08:03+5:30

येथील नगरपरिषदच्या बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी घाटंजी मुख्याधिकाºयांना चौकशीसाठी पत्र दिले.

Annant Satyagraha movement at Ghatanji | घाटंजी येथे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन

घाटंजी येथे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन

Next
ठळक मुद्देयेथील नगरपरिषदच्या बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : येथील नगरपरिषदच्या बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी घाटंजी मुख्याधिकाºयांना चौकशीसाठी पत्र दिले. परंतु त्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप तक्रारकर्ते मधुकर निस्ताने यांनी केला आहे. भ्रष्टाचाराची सखोल चौकशी त्वरित करण्यात यावी, या मागणीसाठी मधुकर निस्ताने यांनी २ आॅक्टोबर गांधी जयंती दिनी अन्न व पाणी त्याग सत्याग्रह केला.
घाटंजी येथील युवा कार्यकर्ते अ‍ॅड.संदीप माटे, मनोज हामंद, मनसेचे गजानन भालेकर, प्रहारचे सुरज हेमके यांनीदेखील निस्ताने यांच्या आंदोलनाला पाठिंबा देवून तहसीलदारांना निवेदन दिले. मधुकर निस्ताने यांच्यासोबत प्राऊटीस्ट ब्लॉकचे हरिभाऊ पेंदोर, सैयद कादर, मोहन प्रधान, अमोल बाहेकर, निखिल कुलरे, गजानन राऊत, प्रफुल्ल राऊत, गोपाल नामपेल्लीवार, दिनकर मानकर, अशोक जयस्वाल आदींनी उपोषणात सहभाग घेतला. दरम्यान, मुख्याधिकाºयांनी चौकशी समिती गठित करून महिनाभरात चौकशी करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Annant Satyagraha movement at Ghatanji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.