सातेफळ येथे अन्नत्याग आंदोलन

By admin | Published: March 20, 2017 12:21 AM2017-03-20T00:21:57+5:302017-03-20T00:21:57+5:30

महागाव तालुक्याच्या चिलगव्हाण येथील साहेबराव करपे व मालती करपे या शेतकऱ्यांच्या ३१ व्या स्मृतिदिनी तालुक्यातील सातेफळ येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

The Annate Movement at Sithef | सातेफळ येथे अन्नत्याग आंदोलन

सातेफळ येथे अन्नत्याग आंदोलन

Next


घरासमोर काळी रांगोळी : रॅली काढून नोंदविला निषेध, डोंगरखर्डा येथे श्रद्धांजली कार्यक्रम

नेर : महागाव तालुक्याच्या चिलगव्हाण येथील साहेबराव करपे व मालती करपे या शेतकऱ्यांच्या ३१ व्या स्मृतिदिनी तालुक्यातील सातेफळ येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. शेतकरी आत्महत्येच्या घटनेचा निषेध नोंदवित ग्रामस्थ या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. प्रत्येक घरासमोर काळ्या ठिपक्याची रांगोळी काढण्यात आली. रॅली काढून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. या गावात यापूर्वी पेरणी बंद आंदोलन झाले होते.

शेतकरी आत्महत्यांविषयी संवेदना आणि शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध याठिकाणी करण्यात आला. करपे यांच्या आत्महत्येनंतरही शेतकऱ्यांना शासनाने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. अजूनही अनेक शेतकरी विवंचनेत आहेत. या आंदोलनात ग्रामपंचायत कर्मचारी गजानन खरे याला शस्त्रक्रियेसाठी लोकवर्गणी करून मदतीचा हात दिला. आंदोलनामध्ये वैभव ठाकरे, दीपक भोयर, रवींद्र राऊत, प्रमोद वाठ, विलास भेंडे, सारधर सोनोने, महादेव कवाडे, संदीप वानखडे, रवी पंचक्रोशी, दीपक सोनोने, नरेंद्र खेडकर, संजय गवले, अरुण लोहपुरे, देवीदास पवार, निखिल बायस्कर, राहुल सोनोने, शशिकांत चांदोरे, हिरावती चौधरी, सविता इसोतकर, पद्मिनी आलाटे, राधिका पुंड, इंदु गठुले, जयश्री नागुलकर, पुष्पा बायस्कर आदी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)

आर्णीत बसस्थानक चौकात आंदोलन
आर्णी : शेतकरी साहेबराव करपे (ता.महागाव) यांच्या ३१ व्या स्मृती दिनी आत्महत्या केलेल्या सर्व शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच येथील बसस्थानक चौकात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप बुटले, नगरपरिषद गट नेते चिराग शाह, नगरसेवक यासीन नागानी, शेखर खंदार, फिरोज सोलंकी, संजय व्यवहारे, मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन येलगंधेवार, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष विजय दुलसिंग राठोड, संदीप पवार, जाफर शेख, रहेमान शाह, नगरसेवक शंकर वाघमारे, शरीफभाई, जयवंत वानखडे, सद्दाम शेख, सुभाष सुस्तरकार, रवींद्र ठाकरे, परवेझ मिर्झा, हारून पेंटर, फारूकभाई, युनुस बेग आदी सहभागी झाले होते. येथून ही मंडळी महागाव येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाली. (शहर प्रतिनिधी)

मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली
कळंब : तालुक्यातील डोंगरखर्डा येथे स्वामिनी जिल्हा दारुबंदी अभियानच्यावतीने अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. सामूहिक आत्महत्या करणाऱ्या साहेबराव करपे कुटुंबाला यावेळी मेणबत्या पेटवून श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. यावेळी अभियानाच्या कळंब तालुका संयोजक मनीषा काटे, गजानन पंचबुध्दे, शौकत अली सैयद, सुधाकर निखाडे, सुभाष काकडे, अली सैयद, मारोती लढी, वामन देशमुख, दिलीप खेकारे, दिनेश राठोड, प्रभाकर जांभुळे, सुरेश कनोजे, विनोद पंचबुध्दे, देविदास आत्राम, प्रभाकर ठाकरे, शैलेंद्र पांडे, शामराव गायकवाड, रमेश जांभुळे, किशोर वरफडे, पवन नानवटकर, शैलेश भिसे, प्रफुल्ल इंगळे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The Annate Movement at Sithef

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.