नेताजींची जयंती राष्ट्रप्रेम दिन जाहीर करा
By admin | Published: January 25, 2017 12:27 AM2017-01-25T00:27:55+5:302017-01-25T00:27:55+5:30
देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन राष्ट्रप्रेम दिवस म्हणून जाहीर करावा, यादिवशी
मागणी : नेताजी चौकात ध्वजवंदन, फुटपाथ व्यावसायिकांचा पुढाकार
यवतमाळ : देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन राष्ट्रप्रेम दिवस म्हणून जाहीर करावा, यादिवशी संपूर्ण देशात सुटी जाहीर करावी, अशी मागणी माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांनी केली. येथील नेताजी चौकात आयोजित नेताजी जयंती कार्यक्रमप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.
विदर्भ अन्याय निवारण समिती, फुटपाथ दुकानदार संघ नेताजी मार्केटच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अॅड. क्रांती धोटे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. प्रसंगी माजी आमदार विजयाताई धोटे, श्रीराम खिरेकर, प्रभाकर काळे, लालजी राऊत आदींनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला शेख जाकीर, तुकाराम खडसे यांच्यासह नेताजी मार्केटमधील व्यावसायिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी गणेश पोसरकर, दिनेश पाचकवडे, अनुप तेलंग, प्रशांत गंगमवार, अंकुश साठवणे, प्रकाश गुल्हाने, अमोल पाटील आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)