यवतमाळचा रँचो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 05:23 PM2018-11-02T17:23:34+5:302018-11-02T17:24:13+5:30

आईनस्टाईनने एकाचवेळी चार पेटेंटची नोंद केली होती. अजिंक्यनेही एकाचवेळी चार पेटेंटची नोंद करीत आईनस्टाईनशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला आहे.

Another Rancho from Yawatmal | यवतमाळचा रँचो

यवतमाळचा रँचो

Next
ठळक मुद्देथ्री ईडिटसमधला सोनम वांगुचक पुढे सरसावला

रुपेश उत्तरवार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: अजिंक्य कोत्तावार हा युवक मूळचा यवतमाळचा रहिवासी आहे. त्याने अभियांत्रिकीचे संपूर्ण शिक्षण येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयातून (जेडीआयईटी) पूर्ण केले. पुस्तकी ज्ञानासोबत अफाट तांत्रिक ज्ञानामुळे तो दररोज नानाविध संशोधनात सखोल अभ्यास करीत असतो. यात त्याला यशही मिळत आहे. शिक्षण घेताना त्याने काही पेटेंट स्वत:च्या नावावर रजिष्टर्ड केले. आईनस्टाईनने एकाचवेळी चार पेटेंटची नोंद केली होती. अजिंक्यनेही एकाचवेळी चार पेटेंटची नोंद करीत आईनस्टाईनशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला आहे.
अजिंक्यने मिळविलेल्या पेटेंटचा अभ्यास करून त्याचा अंमल केल्यास देशाच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे. एवढेच नव्हे तर प्रदूषणाला लगाम लागणार आहे. चहाच्या मळ्यामध्ये शेंड्यांची पाने खुडली जातात. त्याचा चहा तयार होता. इतर पाने वेस्टेज जातात. या वेस्टेज पानापासून बायोडिझल तयार करण्यात अजिंक्यला यश मिळाले आहे. त्यावर गाडीदेखील चालविली आहे. आसाममधील नीट सिलचरला त्याने यावरचे संशोधन पूर्ण केले आहे. यात त्याला यश मिळाले. मात्र नंतरच्या कालखंडात त्याचा अंमल झाला नाही.

बटण दाबताच इंजिनचे सीसी बदलणार
गेअर टाकताच गाडी पिकअप घेते. त्याचप्रमाणे बटण दाबताच इंजिनचे सीसी बदलणार आहे. याविषयाचा प्रयोग त्याने नुकताच यशस्वी केला आहे. त्याचे पेटेंट मिळविल्यानंतर चारचाकी वाहन क्षेत्रातील कंपनीशी त्याने बातचीत केली. यामुळे वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे.वाहन चोरी गेले अथवा अपघात झाल्यास ही माहिती संबंधितापर्यंत पोहोचण्यासाठी जीएसएम आणि जीपीएस प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. त्याकरिता सेन्सर कम्युुनिकेशन कार्ड त्याने वापरले आहे. यामुळे अपघात झाला अथवा वाहन चोरीला गेल्यास घरापर्यंत तत्काळ माहिती पोहचणार आहे. यामुळे दुर्घटनेमध्ये संबंधित व्यक्तीचा जीव वाचविता येणार आहे.

पाण्याची शुध्दता करणारी शॉक ट्रिटमेंट
पाण्याच्या शुध्दतेसाठी फिल्टर डिव्हाईस तयार केला आहे. त्याचे पेटेंट मिळविले आहे. फिल्टरमधील कॅन्डल फेकून न देता त्याचे आयुष्य पुन्हा वाढविण्यासाठी केमिकल प्रोसेसने शक्य होणार आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचा आर्थिक भुर्दंड वाचणार आहे. यासोबतच फिल्टर चाळणीच्या माध्यमातून शॉक ट्रीटमेंट केली तर पाण्यातील हार्डनेस कमी होईल आणि पाण्याची शुध्दता वाढण्यास मदत होणार आहे. त्याच पध्दतीने रेन वॉटर हार्वेस्टींगच पाणी विहिरीत अथवा बोअरमध्ये गढुळ होते. त्यासाठी फिल्टर पाईप वापरल्यास पाणी स्वच्छ होऊन शुद्ध स्वरूपातच विहिरीमध्ये जाईल. यामुळे पाण्याची शुध्दता निर्माण होईल. यामुळे १२ फुटांपेक्षा खाली शुध्द स्वरूपात पाणी पोहोचविणे शक्य होणार आहे.

पोल्यूशन कन्ट्रोल डिव्हाईस
प्रत्येक वाहनाला लावण्यात आलेल्या सायलेन्सरचे ठराविक आयुष्य आहे. नंतरच्या काळात त्यातून प्रदूषित वायू बाहेर टाकल्या जातो. अशा स्थितीत सेन्सर बदलविणे अवघड आणि महागडे काम आहे. यामुळे कुणीही त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्याला पोल्यूशन कन्ट्रोल डिव्हाईस लावल्यास प्रदूषण रोखणे शक्य होणार आहे. त्याकरिता येणारा खर्च नगण्य राहणार आहे. या डिव्हाईसला बसविण्यासाठी केंद्रीय अवजड वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवी झेंडी दिली आहे. त्यानुसार पोल्यूशन कन्ट्रोल डिव्हाईस तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

थ्री ईडिटसमधला सोनम वांगुचक पुढे सरसावला
शिक्षण क्षेत्रात देशभरातील दिग्गज व्यक्तींनी एकत्र येऊन ज्ञान प्रबोधिनी स्थापन केली आहे. या प्रबोधिनीच्या माध्यमातून प्रयोगाद्वारे शिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा रुंदावण्यासाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त तंत्रज्ञान शिकवले जाणार आहे. त्या टीममद्ये सोनम वांगचुक, प्रयासचे अविनाश सावजी, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. निशीकांत देशपांडे, डॉ. विजय भटकर, डॉ. राजशेखर मूर्ती, डॉ. विशाल लिचडे यांच्यासोबत नागपुरातील अजिंक्य काम करीत आहे.

Web Title: Another Rancho from Yawatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.