यवतमाळात पुन्हा एका महिलेचा रिपोर्ट पॉजिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:40 PM2020-05-19T23:40:06+5:302020-05-19T23:40:26+5:30
संस्थात्मक विलागीकरण कक्षामध्ये भरती असलेल्या महिलेचा रिपोर्ट नव्याने पॉजिटिव्ह आला आहे. ही महिला हुडी, ता. पुसद येथील पॉजिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य आहे. त्यामुळे जिल्ह्यात एक्टिव पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा 7 वर गेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: संस्थात्मक विलागीकरण कक्षामध्ये भरती असलेल्या महिलेचा रिपोर्ट नव्याने पॉजिटिव्ह आला आहे. ही महिला हुडी, ता. पुसद येथील पॉजिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य आहे. त्यामुळे जिल्ह्यात एक्टिव पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा 7 वर गेली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाला आता 16 रिपोर्ट्स प्राप्त झाले. यापैकी 1 पॉजिटिव्ह आणि 15 निगेटिव्ह आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या 101 वर गेली असून यापैकी 94 जण बरे होऊन घरी गेले आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या व सुरवातीला पॉझेटिव्ह रिपोर्ट आलेल्या एका व्यक्तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढील 14 दिवस त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात सहा अॅक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण 19 जण भरती आहेत. यात 13 प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.
मंगळवारी आयसोलेशन वॉर्डात चार जण भरती करण्यात आले. जिल्ह्यात सुरवातीपासून पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 100 वर गेला असून आतापर्यंत 1693 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 14 जण तर गृह विलगीकरणात एकूण 760 जण आहेत.