कुणीही यावे आणि शिट्टी वाजवून जावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 09:30 PM2019-07-09T21:30:00+5:302019-07-09T21:31:10+5:30

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. यात पंच म्हणून जबाबदारी सांभाळायची असल्यास तुम्हाला कोणत्याही खेळाचे नियम वा माहिती असलीच पाहिजे असे नाही. अधिकृत पंच असणेही गरजेचे नाही.

Anyone should come and blow | कुणीही यावे आणि शिट्टी वाजवून जावे

कुणीही यावे आणि शिट्टी वाजवून जावे

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा क्रीडा कार्यालय : शालेय क्रीडा स्पर्धेत पंचाच्या निवड प्रक्रियेचे नियमच नाही, माहिती अधिकारातून वास्तव उघड

नीलेश भगत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. यात पंच म्हणून जबाबदारी सांभाळायची असल्यास तुम्हाला कोणत्याही खेळाचे नियम वा माहिती असलीच पाहिजे असे नाही. अधिकृत पंच असणेही गरजेचे नाही. तर संबंधित तालुका क्रीडा संयोजकासोबत ओळख असली आणि शिट्टी वाजविता आली की, काम झालेच म्हणून समजा. ‘कोणीही यावे आणि शिट्टी वाजवून जावे’ असा गंभीर प्रकार जिल्हा क्रीडा कार्यालयात सुरू असल्याचे वास्तव माहिती अधिकारातून उघड झाले.
शालेय तालुका स्पर्धेसाठी शासनस्तरावर राबविली गेलेली गत ३ वर्षातील पंच निवड प्रक्रिया, आमंत्रित केलेल्या पंचांचे खेळनिहाय नाव व पंचांना पाठविलेल्या नेमणूक पत्राची झेरॉक्स प्रत आदी माहितीची मागणी माहिती अधिकारातून करण्यात आली होती. मागितलेल्या माहिती संदर्भात कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याचे व पंचाची निवड जिल्हा क्रीडा कार्यालयाला स्पर्धेत सहकार्य करणारे तालुका क्रीडा संयोजक स्वत:च करीत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
तालुका क्रीडा स्पर्धेत कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, अ‍ॅथ्लेटिकसह दहा खेळांचा समावेश आहे. शारीरिक शिक्षकांनी आपल्यामधून निवडून दिलेले तालुका क्रीडा संयोजक क्रीडा कार्यालयाच्या मार्गदर्शना या स्पर्धा आयोजित करतात. आयोजनासाठी प्रतिखेळ दहा हजार रुपये शासनाकडून दिले जातात. यातून पंचांनाही विशिष्ट मानधन आहे.
क्रीडा कार्यालय तालुका स्पर्धेकडे फारसे लक्ष देत नसल्याने तालुका क्रीडा संयोजक स्वत: आपल्या मर्जीतील शिक्षकांना पंच म्हणून जबाबदारी देतात. अपवाद वगळता सर्वत्र हाच प्रकार घडत आहे. मग एकच शिक्षक कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, व्हॉलिबॉल अशा अनेक खेळात शिट्टी वाजवितो. उपस्थित असलेल्या पंच शिक्षकांना त्या खेळाचे शास्त्रशुद्ध ज्ञानही नसते. केवळ मॅच काढणे हाच उद्देश असतो. अशावेळी वर्षभरापासून सराव करणाऱ्या खेळाडूंचे नुकसान होते. चुकीच्या निर्णयामुळे बºयाचदा उभय संघ व पंचादरम्यान भांडणाची परिस्थिती उद्भवते. या पंचाकडून नियमानुसार स्पर्धा घेतली जाईलच, असे नाही. दोन वर्षापूर्वी यवतमाळ तालुका कबड्डी स्पर्धेत बोनस लाईन न आखता केवळ दोन-दोन मिनिटात मॅचेस गुंडाळण्यात आल्या होत्या. क्रिकेटची मॅच पूर्ण वेळ न खेळविता दोन ते चार ओव्हर वा केवळ टॉसवरही घेण्यात आल्या. तशी रितसर तक्रार गतवर्षी शारीरिक शिक्षकांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे केली होती.

अनुभवी खेळाडूंचे सहकार्य नाकारले
जिल्ह्यात विविध खेळांच्या एकविध क्रीडा संघटना आहे. या संघटनेकडे अधिकृत पंच, राष्ट्रीय खेळाडू असतात. अशा संघटनेने स्वत:हून क्रीडा कार्यालयाकडे स्पर्धा आयोजनात आम्ही सहकार्य करण्यास तयार आहो, असे लेखी दिलेले आहे. क्रीडा कार्यालयाने शालेय स्पर्धेत क्रीडा संघटना व संबंधित खेळांतील राष्ट्रीय खेळाडूंचे, माजी खेळाडूंचे सहकार्य घेणे अपेक्षित आहे. मात्र तालुका क्रीडा संयोजक व क्रीडा कार्यालय ‘अर्थपूर्ण’ फायद्यासाठी उपस्थित शिक्षक व व्यक्तींच्या आडून वेळ मारून नेत आहे.

Web Title: Anyone should come and blow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.