‘एपीसीसीएफ’ मंडेंनी स्पॉट व्हिजीट टाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 09:40 PM2018-08-02T21:40:38+5:302018-08-02T21:41:54+5:30

नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणात हजारो परिपक्व सागवान वृक्षांची अवैधरीत्या तोड केली गेली. ही तोड राज्यभर गाजत आहे. परंतु मंगळवारी यवतमाळ दौऱ्यावर आलेले जिल्ह्याचे पालक अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक अशोक मंडे यांनी या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जाते.

The 'APCCF' Mandeni prevented the spot wizard | ‘एपीसीसीएफ’ मंडेंनी स्पॉट व्हिजीट टाळली

‘एपीसीसीएफ’ मंडेंनी स्पॉट व्हिजीट टाळली

googlenewsNext
ठळक मुद्देअवैध वृक्षतोड : महामार्गावरील कत्तल दुर्लक्षित

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणात हजारो परिपक्व सागवान वृक्षांची अवैधरीत्या तोड केली गेली. ही तोड राज्यभर गाजत आहे. परंतु मंगळवारी यवतमाळ दौऱ्यावर आलेले जिल्ह्याचे पालक अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक अशोक मंडे यांनी या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जाते.
‘एपीसीसीएफ’ अशोक मंडे यांनी यवतमाळ वनवृत्त कार्यालयात मंगळवारी आढावा बैठक घेतली. यावेळी वृक्षतोडीवर चर्चाही झाली. परंतु सीसीएफ कार्यालयाने आपल्या स्तरावर सर्वांचे ‘समाधान’ करावे, पीसीसीएफ कार्यालयापर्यंत तक्रारी येऊ देऊ नये, माध्यमांचीही समजूत काढा अशा सूचना मंडे यांनी दिल्याचे सांगितले जाते. मंडे हे अवैध वृक्षतोड झालेल्या महामार्गावर प्रत्यक्ष भेट देऊन स्थितीचा आढावा घेतील, असे मानले जात होते. परंतु प्रत्यक्षात मंडे यांनी स्पॉट व्हीजीट न करता केवळ कार्यालयात बसून आढावा घेण्यातच धन्यता मानली. त्यांनी या वृक्षतोडीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे वनवर्तुळात बोलले जाते.
राजकीय वरदहस्त लाभलेल्या एका टोळीच्या म्होरक्याला वृक्षतोडीचा हा कंत्राट दिला गेला आहे. या टोळीने कायदा, नियम धाब्यावर बसवून वृक्ष कटाई केली. त्यातील लाकूड परस्पर विकले. त्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असून त्याचे ‘लाभार्थी’ही अनेक आहेत. खानापूर्तीसाठी नाममात्र लाकूड दाखवून त्याचा अवघा ४४ लाखांत लिलाव केला गेला. प्रत्यक्षात या मार्गावर वृक्षतोड झालेल्या लाकडांची किंमत कोट्यवधींच्या घरात असल्याचे सांगितले जाते.
महामार्गासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड मंत्रालयापर्यंत गाजत असल्याचे पाहून स्थानिक वन प्रशासनाने आता त्यात नियम-कायद्यांचा आडोसा घेऊन सारवासारव सुरू केली आहे. अशोक मंडे यांनी टाळलेली स्पॉट व्हीजीट त्याचाच एक भाग असल्याचे मानले जाते.
वृक्ष कटाईला राजकीय आशीर्वाद
नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे निर्माण सुरू आहे. या मार्गाचे दोन्ही बाजूने रुंदीकरण केले जात आहे. ते करत असताना चक्क जंगलातच व संरक्षित वनात खोदकाम केले गेले. त्या मधात येणारी परिपक्व सागवान वृक्षे विना परवाना तोडली गेली. वृक्षतोडीचा हा कंत्राट येथील राजकीय अभय असलेल्या एका टोळीच्या म्होरक्याला दिला गेला. या टोळीचे तमाम सदस्य सदर वृक्षतोडीत व्यस्त आहेत. त्यांनी वन खात्याची किंवा वन विषयक कायद्यांची कोणतीही तमा न बाळगता क्रूरपणे सागवान वृक्षांची कत्तल केली.

Web Title: The 'APCCF' Mandeni prevented the spot wizard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.