शेतकऱ्यांनी पिकविमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:26 AM2021-07-12T04:26:15+5:302021-07-12T04:26:15+5:30
प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२०-२१ पासून तीन वर्षांकरिता राज्यात राबविण्याबाबत शासनाने २९ जून २०२० च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता ...
प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२०-२१ पासून तीन वर्षांकरिता राज्यात राबविण्याबाबत शासनाने २९ जून २०२० च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२१ राज्यात राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे. सदर योजनेत शेतकरी सहभागाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी कापूस, तूर, सोयाबीन, खरीप ज्वारी व मूग पिकांचा विमा काढता येईल. विमा काढण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अंतिम मुदत दि.१५ जुलै २०२१ ही आहे. शेतकऱ्यांनी अधिसुचित महसूल मंडळातील अधिसूचित पीकनिहाय कापूस दोन हजार रुपये प्रति हेक्टरी, सोयाबीन ८०० रुपये प्रति हेक्टरी, तूर ७०० रुपये प्रति हेक्टरी, ज्वारी ५००, उडीद ४००, मूग ४०० रुपये प्रति हेक्टरी, याप्रमाणे पीकविम्याचा शेतकऱ्यांनी हप्ता भरावयाचा आहे. यवतमाळ जिल्ह्याकरिता इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीची शासनाकडून निवड करण्यात आली आहे. शेवटच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी आपल्या पिकाचा पीकविमा हप्ता अंतिम मुदतीच्या आतच भरावा व योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड यांनी केले आहे.