माळी महासंघाचे तहसीलदारांना निवेदन
By admin | Published: April 5, 2017 12:20 AM2017-04-05T00:20:59+5:302017-04-05T00:20:59+5:30
भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपींना फाशी द्या,
लाखांदूरच्या घटनेचा निषेध : आरोपींना कठोर शिक्षेची मागणी
नेर : भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपींना फाशी द्या, अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय माळी महासंघातर्फे तहसीलदारांना दिले.
घटनेचा तपास सक्षम अधिकाऱ्यांकडून करावा, सोशल मीडियावर व्हायरल झालेली चित्रफीत थांबवा, ही चित्रफीत व्हायरल करणाऱ्यांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करा, पीडित कुटुंबांना संरक्षण द्या, जलदगती न्यायालयात खटला चालवा, अॅड़ उज्वल निकम यांच्यासारख्या वकिलाची नियुक्ती करा, पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत द्या, आरोपींना मदत करणाऱ्या पोलिसांना बडतर्फीची कारवाई करा आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहे.
निवेदन देताना महासंघाचे जिल्हा संघटक गणेश राऊत, डॉ. प्रवीण बनसोड, प्रा. पी.एस. आठवले, विजय राऊत, तालुका अध्यक्ष मनोज नाल्हे, प्रदीप शेंदुरकर, पंकज गोल्हर, विनोद गोबरे, रुपेश मांदाडे, दिनेश गायकवाड, माजी सरपंच राजेश कावळे, किशोर चरडे, वासुदेव शेंडे, सुदाम राठोड, प्रकाश भबुतकर, अशोक खोब्रागडे, प्रदीप भगत, सुधाकर तायडे, राहूल तायडे, नितीन बोकडे, मिसळे, हजारे यांच्यासह माळी महासंघ, बहूजन क्रांती मोर्चा व भारतीय विद्यार्थी मोर्चाचे सदस्य उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)