शेतकऱ्यांची कामे विनाविलंब मार्गी लावा

By admin | Published: February 7, 2016 12:42 AM2016-02-07T00:42:36+5:302016-02-07T00:42:36+5:30

शेतकऱ्यांची कामे तत्काळ मार्गी लावा, प्रलंबित ठेवू नका, त्यांना वेठीस धरू नका अशा सूचना वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी येथे केले.

Apply for farmers' work continuously | शेतकऱ्यांची कामे विनाविलंब मार्गी लावा

शेतकऱ्यांची कामे विनाविलंब मार्गी लावा

Next

किशोर तिवारी : आर्णी येथे ग्रामस्तरीय समिती प्रबोधन मेळावा, अभियानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव
आर्णी : शेतकऱ्यांची कामे तत्काळ मार्गी लावा, प्रलंबित ठेवू नका, त्यांना वेठीस धरू नका अशा सूचना वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी येथे केले.
बळीराजा चेतना अभियानांतर्गत ग्रामस्तरीय समितीचा प्रबोधन मेळावा येथे घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, आशा वर्कस हे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे हित जोपासणारे कर्मचारी आहेत. कृषी सहायकाची भूमिका महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांशी सौजन्याने वागा असे निर्देश या कर्मचाऱ्यांना यावेळी देण्यात आले. याप्रसंगी मंचावर उपविभागीय अधिकारी विकास माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गायनार, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदे, नगराध्यक्ष आरीज बेग, तहसीलदार हनुमंत रजनलवार, गटविकास अधिकारी सी.जी. चव्हाण, कृषी विभागाचे कळसे, संजय पाठक, सहाय्यक गटविकास अधिकारी खारोडे, नायब तहसीलदार यु.डी. तुंडलवार, विवेक दहिफळे, ठाणेदार संजय खंदाडे, बिपीन राठोड, रावसाहेब जुमनाके, अंकुश नैताम, आर.बी. मांडेकर आदी उपस्थित होते.
तालुक्यात बळीराजा चेतना अभियान राबविणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात तलाठी श्याम रणनवरे, सुनील सुखदेवे, दत्ता मारकड, राजू मादेश्वार, पवन राठोड, बाबाराव चव्हाण यांचा समावेश आहे. कार्यक्रमासाठी तीर्थरुप मंगल कार्यालय विनाशुल्क उपलब्ध करून दिल्याबद्दल पी.बी. आडे यांचे यावेळी आभार मानण्यात आले.
संचालन प्रमोद कुदळे यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य, शिक्षण आदी विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Apply for farmers' work continuously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.