आर्णी येथे ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 10:09 PM2017-07-29T22:09:26+5:302017-07-29T22:10:18+5:30
तालुका विधिसेवा समितीच्यावतीने येथे ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानांतर्गत रॅली काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुका विधिसेवा समितीच्यावतीने येथे ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानांतर्गत रॅली काढण्यात आली. न्यायमूर्ती चैतन्य कुळकर्णी, न्यायमूर्ती ए.के. अलमोदी, तहसीलदार सुधीर पवार, रमेश खारोडे, अॅड.दुर्गादास राठोड, रावसाहेब जुमनाके, किशोर रावते, अॅड.सुनील व्यवहारे, अॅड.प्रमोद चौधरी, सरकारी वकील मीना प्रधान, समृद्धी सुनील व्यवहारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री म.द. भारती विद्यालयासमोरून रॅलीला सुरुवात झाली.
माहूर चौक, बसस्थानक, शिवनेरी चौक, मेन रोड आदी भागातून मार्गक्रमण करत रॅली तहसील कार्यालयात पोहोचली. समृद्धी चिंतावार या विद्यार्थिनीने एकपात्री प्रयोग सादर केला. विविध ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले. रॅलीमध्ये लोकमत सखी मंच, संस्कार कलश, लायन्स क्लब, ज्येष्ठ नागरिक मंडळ, गुजराती मंडळ, म.द. भारती शाळा, डॉ.राधाकृष्णन प्राथमिक मराठी शाळा, श्री म.द. भारती महाविद्यालय, सनराईज नर्सरी कॉन्व्हेंट, नारायणलिला, साई ईश्वरी, स्वामी विवेकानंद शाळा, वन विभाग, भगतसिंग विद्यालय, देवराव पाटील कन्या शाळा, गांधीनगर प्राथमिक मराठी शाळा आदींचा सहभाग होता.
यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी न्यायमूर्ती चैतन्य कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. स्त्री भ्रूणहत्त्या थांबविण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी किशोर रावते, कांतीलाल कोठारी, दीपक कोठारी, सी.एस. गावंडे, मधुकर ठाकरे, राजेंद्र राऊत, माणिक देशमुख, अॅड.रवींद्र ठाकरे, अॅड.सुनील व्यवहारे, दीपाली ठाकरे, ईश्वर दुगड, यादवराव ठाकरे, चित्रा माहुरे, संगीता रावते, सीमा कोठारी, सीमा चिंतावार, संध्या मिर्झापुरे, कल्पना तायडे, विश्वगीता जोशी, राजश्री राठी, सपना नालमवार, अनिता राठोड, सीमा पद्मावार, सुरेखा देमापुरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर वृक्षारोपण करण्यात आले. रॅलीतील विद्यार्थ्यांना किशोर छल्लाणी यांच्यातर्फे चॉकलेट वाटप करण्यात आले. विविध सामाजिक संघटनांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जागोजागी केली होती.