आर्णी बायपासवर १५ लाखांचा गुटखा सोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 10:18 PM2018-09-04T22:18:55+5:302018-09-04T22:21:47+5:30

गुटखा तस्करीतून जिल्ह्यात दिवसाला कोट्यवधीची उलाढाल होत आहे. पूर्वी अमरावती, कारंजा व नागपुरातील तस्करांचा बोलबाला होता. मात्र आता संपूर्ण यंत्रणा आर्णीतील महेमूदच्या अधिपत्याखाली आहे. दहा दिवसांपूर्वी रात्री शाखेतील कर्मचाऱ्यांनी तपासणी नाक्यावर मालवाहू जीप भरून गुटखा पकडला.

Aranyi Bypass left Gutka for Rs 15 lakh | आर्णी बायपासवर १५ लाखांचा गुटखा सोडला

आर्णी बायपासवर १५ लाखांचा गुटखा सोडला

Next
ठळक मुद्देशाखेतील कर्मचारी : ‘महेमूद’च्या नेटवर्कला यंत्रणेची साथ, साठवणुकीचे केंद्र आर्णीत

सुरेंद्र राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गुटखा तस्करीतून जिल्ह्यात दिवसाला कोट्यवधीची उलाढाल होत आहे. पूर्वी अमरावती, कारंजा व नागपुरातील तस्करांचा बोलबाला होता. मात्र आता संपूर्ण यंत्रणा आर्णीतील महेमूदच्या अधिपत्याखाली आहे. दहा दिवसांपूर्वी रात्री शाखेतील कर्मचाऱ्यांनी तपासणी नाक्यावर मालवाहू जीप भरून गुटखा पकडला. मात्र ही कारवाई पुढे सरकलीच नाही. एका फोन कॉलवर वाहन सोडून दिले. यावरून तस्काराच्या नेटवर्कची रेंज कुठपर्यंत आहे, हे स्पष्ट होते.
गुटखा कारवाईचा पोलिसांना अधिकार नसला तरी प्रतिबंधित वस्तू म्हणून जप्त करता येते. त्यानंतर गुन्हे दाखल करण्यापासून तपासाची संपूर्ण जबाबदारी अन्न प्रशासन विभागाची आहे. या विभागाकडे अधिकारी, कर्मचारीच नाही. त्यामुळे गुटखा तस्कर केवळ पोलिसांची मर्जी राखून आपले नेटवर्क मजबूत करत आहे. आर्णीतील महेमूदने मागील सहा महिन्यात संपूर्ण यवतमाळ जिल्हाच काबिज केला आहे. ‘राजनिवास’ या नावाने अदिलाबाद येथून गुटखा आयात केला जातो. या तस्करीचे वेगवेगळे मार्ग आहेत. दिवसाला किमान एक ट्रक गुटखा विकण्यात येतो. ही ३० लाखांची उलाढाल आहे.
नंबर दोनचा सर्वात कमी रिस्क असलेला धंदा म्हणून गुटखा तस्करीकडे पाहण्यात येते. कारवाईत माल पकडला इतकेच नुकसान सोसावे लागते. आजपर्यंत एकाही तस्कराला साधी अटक झाली नाही. धाडसत्रात गुटखा पकडलेल्या कारवाईत कोणाविरोधात दोषारोपपत्र दाखल झाले नाही. शिवाय याबाबत कोणी विचारणाही करत नाही. त्यामुळे आता या तस्करीचे नेटवर्क लहान खेड्यातही पोहोचले आहे. तेलंगणा सीमेवरून विविध मार्गाने गुटखा जिल्ह्यात आणून वितरित केला जातो. शिवाय मराठवाड्यातील तालुक्यामध्येही गुटख्याचे कॉऊंटर सुरू केले आहेत. परंतु प्रशासनाकडून केवळ छोट्या माशांवर कारवाई केली जाते. मोठे मासे शोधण्याची तसदी मात्र प्रशासनाने अद्यापही घेतलेली नाही. त्यामुळेच गुन्हा सिद्ध नाही.

गुटखा तस्करीचे प्रमुख मार्ग
अदिलाबाद येथून गुटखा आणण्यासाठी पाढंरवकडा - घाटंजी - अकोलाबाजार - आर्णी हा एक मार्ग आहे. दुसरा मार्ग अदिलाबाद-पाटणबोरी - पारवा - सदोबा सावळी - आर्णी असा आहे. आर्णी हे गुटखा तस्करीचे केंद्र असून पर्यायी व्यवस्था महागाव तालुक्यातील फुलसावंगीत केली आहे. एखाद वेळेस कारवाईची माहिती मिळताच सोयीप्रमाणे माल हलविण्यात येतो.

जिल्ह्यातील तस्कर व त्यांची गुटखा गोदामे
आर्णीतील महेमूदने तस्करीचे संपूर्ण सूत्र स्वत:कडे ठेवले आहे. याचे मुख्य गोदाम शास्त्रीनगरात आहे. तर डोगा कॉलनीत दुकानाआडून वितरण केले जाते. फुलसावंगीत इमायत संपूर्ण कारभार सांभाळत आहे. गावातील शेवटच्या टोकावर गोदाम आहे. घाटंजीत फिरोजने बसस्थानक परिसर आणि आठवडी बाजारात कॉऊंटर उघडले आहे. उमरेखडमध्ये अनिस संपूर्ण कारभार सांभाळत असून ढाणकी, हदगाव येथे दिवसाला एक ट्रक माल उतरविला जातो. दिग्रसमध्ये बसस्थानकाजवळच्या सुगंध सेंटरमधून व्यवहार चालतो. नेरमध्ये तर सलीमने चक्क पोलीस ठाण्यासमोरच दुकान थाटले आहे. गोळ््या-बिस्कीटाआडून गुटख्याचा व्यापार जोरात सुरू आहे. पुसदमध्ये शिवाजी चौक परिसरातूनच गुटखा वितरणाची सूत्र हालतात.

Web Title: Aranyi Bypass left Gutka for Rs 15 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.