नियंत्रणाअभावी सेतूमध्ये मनमानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 09:42 PM2019-06-10T21:42:10+5:302019-06-10T21:42:24+5:30
दहावीचा निकाल जाहीर झाल्याने यावर्षीच्या सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या पाल्यांसाठी विविध प्रकारचे प्रमाणपत्र काढावे लागणार आहे. यामुळे सेतू केंद्रातील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सेतू केंद्रातील गैरप्रकार टाळण्यासाठी तेथे नायब तहसीलदार किंवा समकक्ष दर्जाचा एखादा अधिकारी देण्याची नितांत आवश्यकता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : दहावीचा निकाल जाहीर झाल्याने यावर्षीच्या सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या पाल्यांसाठी विविध प्रकारचे प्रमाणपत्र काढावे लागणार आहे. यामुळे सेतू केंद्रातील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सेतू केंद्रातील गैरप्रकार टाळण्यासाठी तेथे नायब तहसीलदार किंवा समकक्ष दर्जाचा एखादा अधिकारी देण्याची नितांत आवश्यकता आहे.
सेतू केंद्र हे नागरिकांसाठी सुविधा केंद्र आहे. परंतु वणीच्या सेतू केंद्रात ग्राहकांना नाडवले जात आहे. केंद्रातील अनागोंदी कारभारावर कोणाचाही वचक नाही. त्यामुळे येथे काम करणारे संगणक आॅपरेटरच अधिकाऱ्यांच्या आवेशात वागतात. काही मुले दिवसभर केंद्राच्या बाहेर सावज टिपण्याच्या कार्यात गुंतलेले असतात. बाहेर सावज गवसले की त्याचे काम तो म्हणेल त्या कालावधीत करून देण्याची हमी दिली जाते. सेतू केंद्राचा सर्व कारभार आॅनलाईन असतानाही मागचे प्रमाणपत्र एक-एक डेस्क पार करीत पुढे जाते. ज्याचा कोणी वाली नसतो, त्यांची प्रमाणपत्रे दिलेल्या मुदतही तयार करून मिळत नाही.
प्रत्येक आॅपरेटर जादा पैसे ओढण्याच्या मानसिकतेतच संगणकापुढे बसलेला असतो. प्रस्ताव घेणारा तो तपासणारा व प्रमाणपत्र देणारा या सर्वच स्तरावर गांधीजींच्या आशिर्वादानेच काम लवकर होते. जात प्रमाणपत्रासाठी शासनाने २४ नोव्हेंबर २०१७ ला राजपत्र भाग चार-ब प्रसिद्ध करून स्पष्ट केले की, अर्जदाराच्या रक्तसंबंधातील कोणत्याही नातेवाईकाचे जात वैधता प्रमाणपत्र जोडले असल्यास तो महत्वाचा पुरावा मानून इतर पुराव्याची मागणी न करता सक्षम प्राधिकाºयाने जातीचे प्रमाणपत्र निर्गमीत करावे. असे असतानाही वणीच्या सेतूमध्ये कोतवाली बुकाची नक्कल व तेथीलच रहिवासी दाखला याची मागणी केली जाते. शासनाच्या राजपत्रात संबंधित अधिकारी व सेतू केंद्रापर्यंत पोहोचले नाही काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.