सशस्त्र पोलिसांचा जंगलाला वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:47 PM2018-11-30T23:47:20+5:302018-11-30T23:48:07+5:30

अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुळमेथे यांच्यावर हल्ला करून त्यांची निघृणपणे हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी अनिल मेश्राम याचा शोध घेण्याची मोहिम अतिशय तीव्र करण्यात आली आहे.

Armed police encircle the forest | सशस्त्र पोलिसांचा जंगलाला वेढा

सशस्त्र पोलिसांचा जंगलाला वेढा

Next
ठळक मुद्देमारेकऱ्याचा शोध सुरूच : आरोपीने पुन्हा हल्ला केल्यास गोळी झाडण्याचे आदेश

संतोष कुंडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुळमेथे यांच्यावर हल्ला करून त्यांची निघृणपणे हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी अनिल मेश्राम याचा शोध घेण्याची मोहिम अतिशय तीव्र करण्यात आली आहे. शुक्रवारी भल्या पहाटे पाच वाचता २६ सशस्त्र पोलिसांची १३ पथके हिवरी, रोहपटच्या जंगलात सर्चींगसाठी शिरली.
सर्चींगदरम्यान, आरोपीने पोलिसांवर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर गोळ्या झाडण्याचे आदेश गुरूवारी अपर पोलीस अधीक्षक अमरसींग जाधव यांनी दिल्याची विश्वसनिय माहिती आहे. २५ नोव्हेंबरच्या रात्री आरोपी अनिल मेश्राम याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर अनिलने दंडुक्याने हल्ला केला होता. त्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुळमेथे जागीच मृत्यूमुखी पडले. घटनेनंतर मारेकरी अनिल मेश्राम घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेवरून पाच दिवस लोटले तरी मारेकरी पोलिसांच्या हाती लागला नाही. खुद्द एका पोलीस अधिकाºयाची निर्घृण हत्या केली जाते आणि त्या मारेकºयाला पकडण्यात पोलीस यंत्रणेला यश येत नाही, यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
घटनेपासून आरोपीला पकडण्यासाठी पोलीस यंत्रणा संपूर्ण जंगल पिंजून असली तरी मारेकरी पोलिसांना गुंगारा देत आहे. तो हिवरी, रोहपटच्या जंगलातच दडून असल्याची शंका पोलिसांना असून पोलीस या जंगलात त्याचा शोध घेत असले तरी तो अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. तो गुंगारा देण्यात वाक्बगार असल्याचा पोलिसांचा जुना अनुभव आहे.
गुरूवारी पोलिसांनी मारेकºयाला पकडण्यासाठी नवी व्यूहरचना तयार केली. यासाठी एका पथकात दोन सशस्त्र पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली असून अशी १३ पथके शुक्रवारी पहाटे पाच वाजता रोपहटच्या जंगलात रवाना झाली. या पथकाने साखळी तयार केली असून दोन कर्मचारी एकमेकांपासून ५० फुटांच्या अंतरावरून जंगलात शिरले. उर्वरित पोलिसांनी त्या भागातील रस्त्यावर गस्त घातली. मात्र तरीही सायंकाळी उशिरापर्यंत मारेकरी हाती लागला नव्हता. या मोहिमेत यवतमाळसह पांढरकवडा, पाटण, मुुकुटबन, वणी, मारेगाव शिरपूर येथील पोलीस सहभागी झाले आहेत. आरोपीच्या मनात पोलिसांबद्दल प्रचंड राग आहे. रागाच्या भरात तो पोलिसांवर हल्ला करू शकतो. त्यामुळे पोलीसदेखील सतर्कता बाळगून आहेत.

१३ पथकांकडून सर्च, प्रत्येक कर्मचाºयांजवळ पिस्तूल
पोलीस अधिकाºयाची हत्या करून फरार झालेला मारेकरी अनिल मेश्राम याने पोलीस यंत्रणेच्या तोंडाला अक्षरश: फेस आणला आहे. तो अद्याप पोलिसांच्या हाती न लागल्याने पंचक्रोशीत त्याची दहशत कायम आहे. मारेकºयाने पोलिसांवर हल्ला करू नये, म्हणून सुरक्षेसाठी यवतमाळ येथून पथकातील कर्मचाºयांसाठी २५ पिस्तुल पाठविण्यात आल्या. शुक्रवारी पहाटे हे सशस्त्र पोलिसांचे पथक जंगलात रवाना झाले.

Web Title: Armed police encircle the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.