चाेरीतील साेन्याचा यवतमाळात शाेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 12:02 AM2022-10-19T00:02:02+5:302022-10-19T00:02:52+5:30

यवतमाळ शहरातील महाकाली मंदिर परिसरात साेने गाळण्याचे काम केले जाते. काही साेने कारागीरसुद्धा येथे आहेत. याच भागातील एका सराफाने पांढरकवडा शहरातील चाेरट्यांकडून चाेरीचे साेने घेतले. याची माहिती मिळताच सहायक पाेलीस निरीक्षक विजय महल्ले हे पथकासह यवतमाळात दाखल झाले. त्यांनी एलसीबीच्या अधिकाऱ्याला साेबत घेऊन चाेरीेचे साेने घेणाऱ्या सराफाला ताब्यात घेतले.

Army of Cheri found in Yavatmal | चाेरीतील साेन्याचा यवतमाळात शाेध

चाेरीतील साेन्याचा यवतमाळात शाेध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चाेरीचे साेने खरेदी करणारे अनेक महाभाग यवतमाळ शहरात आहेत. नागपूर, मुंबई येथील पाेलीस पथकाने यवतमाळात येऊन कारवाई केली आहे. पांढरकवडा शहरात मागील महिन्यात तीन घरफाेडीच्या घटना घडल्या. स्थानिक पाेलिसांनी या चाेरीच्या गुन्ह्याचा तपास करत आराेपींना ताब्यात घेतले. चाेरट्यांनी चाेरीचे साेने यवतमाळातील सराफाला विकल्याची कबुली दिली़. त्यावरून पाेलिसांनी एका सराफाची चाैकशी केली. 
यवतमाळ शहरातील महाकाली मंदिर परिसरात साेने गाळण्याचे काम केले जाते. काही साेने कारागीरसुद्धा येथे आहेत. याच भागातील एका सराफाने पांढरकवडा शहरातील चाेरट्यांकडून चाेरीचे साेने घेतले. याची माहिती मिळताच सहायक पाेलीस निरीक्षक विजय महल्ले हे पथकासह यवतमाळात दाखल झाले. त्यांनी एलसीबीच्या अधिकाऱ्याला साेबत घेऊन चाेरीेचे साेने घेणाऱ्या सराफाला ताब्यात घेतले. सराफाने चाेरीचे साेने घेतल्याची कबुली दिली़  चाेरीतील  मुद्देमाल घेऊन पाेलिसांनी सराफाला सूचनापत्र दिले आहे. या सराफाला भादंवि ४११ कलमाप्रमाणे आराेपी बनविण्यात येणार आहे. 
यवतमाळात चाेरीच्या साेन्याची माेठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. अतिशय कमी किमतीत चाेरीचे साेने घेऊन त्याचे गाळप करतात. बरेचदा या साेन्याच्या दागिन्यांचे गाळप करून लगड तयार केली जाते. त्यामुळे हा मुद्देमाल पाेलिसांच्या हाती लागला तरी त्याची ओळख पटविणे शक्य हाेत नाही. याचा फायदा आराेपींना न्यायालयात मिळताे. 
चाेरीचा मुद्देमाल घेणारे यवतमाळ शहरात सक्रिय असल्याने येथे घरफाेड्या व चाेरीच्या घटना वाढल्या आहेत. यवतमाळातील पाेलिसांचे यावर काेणतेच नियंत्रण नाही. दरराेज घरफाेडी व जबरी चाेरी शहरात हाेत आहेत. 

स्थानिक पाेलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह 
यवतमाळ शहरात चाेरीचा मुद्देमाल घेणारे काेण आहेत हे सर्वश्रुत आहेत. महानगर, बाहेर जिल्ह्यातील पाेलीस येऊन चाेरीचा मुद्देमाल जप्त करून नेतात. यवतमाळ शहरातील पाेलिसांकडून मात्र काेणतीच कारवाई हाेताना दिसत नाही. शहर, अवधूतवाडी, लाेहारा या तिन्ही पाेलीस ठाण्यातील तपास पथक कधीच चाेरीचा मुद्देमाल घेणाऱ्यांपर्यंत पाेहाेचलेले नाही़ यावरून चाेरीचे साेने घेणाऱ्यांशी स्थानिक पाेलिसांचे हितसंबंध तर जुळेलेले नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

 

Web Title: Army of Cheri found in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर