महागाईविरोधात सेना रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:43 AM2017-09-21T00:43:45+5:302017-09-21T00:44:20+5:30
वाढती महागाई, भारनियमन, दुष्काळी परिस्थिती, नापिकी या प्रमुख बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने बुधवारी आर्णी, महागाव, पुसद, दारव्हा, उमरखेड, बाभूळगाव, वणी आदी तालुक्यात आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वाढती महागाई, भारनियमन, दुष्काळी परिस्थिती, नापिकी या प्रमुख बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने बुधवारी आर्णी, महागाव, पुसद, दारव्हा, उमरखेड, बाभूळगाव, वणी आदी तालुक्यात आंदोलन केले. यवतमाळात शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.
वीज वितरण कंपनीने जिल्ह्यात १६ तासांचे भारनियमन लादले आहे. यामुळे सण, उत्सव अंधारात साजरे करावे लागणार आहे. शेतामधील उभे पिकही अडचणीत सापडले आहे. त्यामुळे भारनियमन तत्काळ बंद करावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे दरही महिन्याला वाढविले जात आहेत. पेट्रोलच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आल्याचा आरोप शिवसेनेने केला.
सरकारने महागाई नियंत्रणात आणावी, अशी मागणी शिवसेनेने केली. यासाठी जिल्ह्यात ठिकठिकणी आंदोलन करण्यात आले. यवतमाळात उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, नगराध्यक्ष कांचन बाळासाहेब चौधरी, राजेश टेंभरे, गिरीष व्यास, शहर प्रमुख पराग पिंगळे, मंगला गुडदे, अभय व्यास, विनोद खोडे, संतोष गदई यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. आर्णी येथे शिवसेनेने डफडे वाजवून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.