शेतकऱ्यांसाठी सेनेचा जिल्हाभर धडक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 05:00 AM2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:00:18+5:30
उमरखेड येथे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सहसंपर्क प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, उपजिल्हा प्रमुख अॅड.बळीराम मुटकुळे, तालुका प्रमुख सतीश नाईक, संतोष जाधव, शहर प्रमुख संदीप ठाकरे, निर्मला विणकरे, रेखा भरणे, सुरेखा गवळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी, राज्यपालांनी घोषित केलेली मदत त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी आदी मागण्यांसाठी सोमवारी जिल्ह्यात शेतकरी धडक मोर्चा काढण्यात आला. उमरखेड, महागाव, दारव्हा, घाटंजी, आर्णी आदी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या मागण्यांसाठी शिवसेनेच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयावर धडक दिली.
दारव्हा येथे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांना निवेदन देण्यात आले. येत्या आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील गटनेते श्रीधर मोहोड, शिक्षण व आरोग्य सभापती कालिंदा पवार, तालुका प्रमुख मनोज सिंगी, शहर प्रमुख राजू दुधे, नगराध्यक्ष बबनराव इरवे, पंचायत समिती सभापती उषा चव्हाण, उपसभापती पंडित राठोड, जिल्हा परिषद सदस्य राधा थरकडे, अश्विनी कुरसिंग यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
उमरखेड येथे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सहसंपर्क प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, उपजिल्हा प्रमुख अॅड.बळीराम मुटकुळे, तालुका प्रमुख सतीश नाईक, संतोष जाधव, शहर प्रमुख संदीप ठाकरे, निर्मला विणकरे, रेखा भरणे, सुरेखा गवळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
घाटंजी येथे तहसीलदार पूजा मातोडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नीलेश चव्हाण, मनोज ढगले, आकाश राठोड, गोपीदास राठोड यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महागाव येथे शिवसेनेने शेतकरी धडक मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले. शिवसेना संपर्क कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. तालुका प्रमुख प्रमोद भरवाडे, रामराव नरवाडे, डॉ.चव्हाण, निर्मला विणकरे आदींनी तहसीलदार नीलेश मडके यांना मागण्यांचे निवेदन दिले.
आर्णी येथे शिवसेनेने तहसीलवर धडक दिली. रवी राठोड, पंकज शिवरामवार, उत्तम राठोड, गणेश भगत, सुयोग चिंतावार, दिनेश कर्णावार, लक्ष्मण पठाडे, राजू शिंदे, सुभाष जोगदंडे, जैनुल्ला शेख, शे.सदाम शे. मस्तान, राजेश राठोड, गोपाल गुडलवार, पुरुषोत्तम पवार, संतोष जाचक, अनिल बोईनवार, जनार्दन मामीडवार, स्वप्नील धोटे, लक्ष्मण कुमरे, सुदाम राठोड आदींनी तहसीलदार धीरज स्थूल यांना निवेदन दिले.
दिग्रस येथे शिवसेनेने मोर्चा काढून तहसीलदार राजेश वजीरे यांना निवेदन दिले. आमदार संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात पंचायत समिती सभापती विनोद जाधव, उत्तम ठवकर, उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, संजीव चोपडे, रामभाऊ मारशेटवार, संजय कुकडी, दिवाकर राठोड, डॉ.विष्णू उकंडे, लखन राठोड, आतीश राठोड, राहूल देशपांडे, संजय इकडे, संदीप रत्नपारखी, यादव पवार, सुभाष जाधव, अजय भोयर, तानाजी घुमनर, बाळू जाधव, सुधीर रत्नपारखी, राहुल धुळधुळे, विष्णू रंगोलकर, बालाजी ठाकरे, प्रकाश राऊत, किसन गावंडे, भीमराव मनवर, रामकृष्ण भरणे आदींनी निवेदन दिले.
अतिवृष्टीचा फटका
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. यामुळे कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, मका आदी पिकांचे नुकसान झाले. उमरखेड तालुक्यात ऊस पिकालाही हानी पोहोचली. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. त्यांना तत्काळ मदत न दिल्यास शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.