आर्णी बलात्काराचा तपास ‘निर्भया’प्रमाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:26 PM2018-10-16T22:26:37+5:302018-10-16T22:27:01+5:30

आर्णीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा निषेध करीत यवतमाळात सकल जैन समाज व विविध संघटनांतर्फे मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर तिरंगा चौकात झालेल्या सभेत आंदोलकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

Arnie raped as 'Nirbhaya' | आर्णी बलात्काराचा तपास ‘निर्भया’प्रमाणे

आर्णी बलात्काराचा तपास ‘निर्भया’प्रमाणे

Next
ठळक मुद्दे‘एसपीं’ची माहिती : मोर्चेकऱ्यांनी नोंदविला संताप

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आर्णीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा निषेध करीत यवतमाळात सकल जैन समाज व विविध संघटनांतर्फे मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर तिरंगा चौकात झालेल्या सभेत आंदोलकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
आर्णीमधील घटनेत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून पीडितेचा जबाब नोंदविणे गरजेचे आहे. या प्रकरणात पीडितेचा जबाब आला नसल्याची खंत पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी मोर्चेकºयांपुढे व्यक्त केली. आर्णीतील पीडितेचे प्रकरण निर्भया प्रकरणाप्रमाणेच न्यायालयात ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी जैन सेवा समिती अध्यक्ष डॉ. रमेश खिवसरा, यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, नगराध्यक्ष कांचन चौधरी, सकल जैन समाजाचे प्रतिनिधी किशोर दर्डा, मुख्याध्यापक अशोक कोठारी, दिलीप छल्लानी, अमरचंद दर्डा, संदीप तातेड, संजय बोरा, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय कोटेचा, भारतीय जैन संघटनेचे माजी विदर्भ अध्यक्ष विजय बुंदेला, अ‍ॅड. अजय चमेडीया, अ‍ॅड. चेतन गांधी, अ‍ॅड. सुशील बोरा, अ‍ॅड. रवीशेखर बदनोरे, विश्व हिंदू परिषद विभाग मंत्री राम लोखंडे, अ‍ॅड. शितल जयस्वाल, मारवाडी महिला मिडटावूनच्या संस्थापिका पुनम जाजू, जैन राजनैतिक चेतना मंचचे जिल्हा अध्यक्ष रवी बोरा, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बंगाले, राजेंद्र भुतडा, वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ अध्यक्ष अशोक तातेड, भारतीय जैन संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाशचंद छाजेड, अभय तातेड (बाभूळगाव), सुनील व्होरा, रोटरी अध्यक्ष अतुल मांगुळकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण तातेड, महेंद्र सुराणा, श्वेतांबर मूर्तिपूजक श्रीसंघ अध्यक्ष प्रसन्न दफ्तरी, ओसवाल महिला समाजाच्या प्रमुख चंदा कोटेच्या, ललित जैन, संजय झांबड, सुनिल भरूड, राजेंद्र लोढा, महेश लोढा (पांढरकवडा), देवेंद्र सकलेचा, कस्तूर सेठीया, वनिता भरूट, वर्षा तातेड, भवरीलाल बोरा, मोहन गांधी, सुभाष जैन, सिकंदर शहा, अशोक जैन यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते. विविध मान्यवरांनी यावेळी घटनेचे गांभीर्य आपल्या भाषणातून मांडले.
सभेचे सूत्रसंचालन अशोक कोठारी, गौतम खाबिया यांनी केले. अभ्यंकर कन्या शाळेच्या विद्यार्थिनी मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

मुख्य आरोपी मोकाटच
मुख्य आरोपी बाहेर आहे, असे मत पीडितेच्या काकांनी पोलीस अधीक्षकांपुढे नोंदविले. यावेळी पोलीस अधीक्षकांनी कोण आहेत, असे म्हणत त्यांना जाब विचारला. यामुळे काही काळ वातावरण तापले. पीडितेच्या काकांनी त्या आरोपींची नावे सांगितली. याचवेळी पाच आरोपींमध्ये सहावे नाव न सांगता पोलिसांनी नोंदविल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. क्रीडा स्पर्धेच्या नावावर दिलेला जामीन योग्य नसल्याचे मत मोर्चेकºयांनी नोंदविले. आरोपी अल्पवयीन असले तरी त्यांनी केलेले कृत्य गंभीर आहे. यामुळे त्यांना बालगुन्हेगार म्हणून मोकळीक देऊ नका, असे मत नोंदविण्यात आले.

सौम्य भाषेचा वापर करा
पीडितेचे कुटुंब दहशतीत आहे. त्यांना मोठ्या आवाजात बोलून आणखी घाबरविले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास महिला पोलिसाकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी मोर्चेकºयांनी केली. यावेळी पोलीस अधीक्षकांनी विजया पंधरे आणि बाविसकर यांच्याकडे तपास सोपविण्यात आल्याची माहिती दिली.

Web Title: Arnie raped as 'Nirbhaya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.