आर्णीच्या ‘अदालती’त १६० वाद निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:21 PM2019-03-19T22:21:27+5:302019-03-19T22:22:10+5:30
येथील तालुका विधिसेवा समितीतर्फे न्यायालयात घेण्यात आलेल्या लोकअदालतीत १६० प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकअदालतीतून ५१ लाखांची वसुली करण्यात आली. या लोकअदालतीत प्रलंबित प्रकरणे व दाखल पूर्वप्रकरणे ठेवण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : येथील तालुका विधिसेवा समितीतर्फे न्यायालयात घेण्यात आलेल्या लोकअदालतीत १६० प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकअदालतीतून ५१ लाखांची वसुली करण्यात आली.
या लोकअदालतीत प्रलंबित प्रकरणे व दाखल पूर्वप्रकरणे ठेवण्यात आली. एकूण १५७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. १५ निगोसिएबल इन्स्ट्रूमेंट अॅक्टचे प्रकरण निकाली काढून ५१ लाख ८६ हजार ७६० रुपयांची वसुली करण्यात आली. आठ कौटुंबिक प्रकरणे निकाली काढली. यात दोन जोडप्यांमध्ये समझोता झाला. बहिणीने भावाविरुद्ध केलेला दावाही तडजोड करून निकाली काढला. मोटार वाहन कायद्यानुसार १२९ प्रकरणे निकाली काढली. त्यातून ६२ हजार ४०० रुपये वसूल झाले. तीन दाखलपूर्व प्रकरणे निकाली निघाली. त्यातून सहा लाख १० हजार रुपये वसूल झाले.
पती-पत्नीमध्येही समेट घडवून आणला. या लोकअदालतीचे उद्घाटन न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी यांनी केले. त्यांच्यासह सहदिवाणी न्यायाधीश अलअमुदी ए.के. यांनी मार्गदर्शन केले. अॅड.के.बी. परदेशी, अॅड.एस.के. राठोड, अॅड.एम.एस. भारती, अॅड.इरफान चव्हाण, अॅड.जी.पी. ठाकरे, अॅड.एस.एस. बोरा, अॅड.जे. के. कोठारी, अॅड.पी.व्ही. चौधरी, ठाणेदार यशवंत बावीस्कर, एपीआय लांडगे, अमी झेंडेकर, मोहमद भगतवाले, मीथून जाधव, न्यायालयीन कर्मचारी एस.व्ही. कोंडावार, एन.बी. चंदेल, एन.वाय. माथने, यू.आर. श्रीवास, एस.डी. बुचेवाड, सी.एच. खरतडे, एस.जे. निशाने, शेटे, एन.आर. गुल्हाने, आर.पी. बावस्कर, नितीन जाधव आदींनी सहकार्य केले.