आर्णीच्या समृद्धीची हवाई सफरसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 09:54 PM2018-06-25T21:54:10+5:302018-06-25T21:54:27+5:30
सर्वसामान्य परिवारातील नागरिकांना आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा, अशी इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. मात्र ‘लोकमत’ संस्काराचे मोती या उपक्रमातून अनेकांना बालवयात हवाई सफर करण्याची संधी मिळत आहे. याच उपक्रमात भाग घेऊन यशस्वी झालेली आर्णी येथील समृद्धी रवींद्र खरतडे ही विद्यार्थिनी आता हवाईसफर करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : सर्वसामान्य परिवारातील नागरिकांना आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा, अशी इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. मात्र ‘लोकमत’ संस्काराचे मोती या उपक्रमातून अनेकांना बालवयात हवाई सफर करण्याची संधी मिळत आहे. याच उपक्रमात भाग घेऊन यशस्वी झालेली आर्णी येथील समृद्धी रवींद्र खरतडे ही विद्यार्थिनी आता हवाईसफर करणार आहे.
‘लोकमत’ संस्काराचे मोती स्पर्धा २०१७ मध्ये घेण्यात आली. या उपक्रमात नागपूर-दिल्ली या हवाई सफरसाठी आर्णी येथील नारायणलीला इंग्लिश मीडियम स्कूलच्या सहाव्या वर्गाची विद्यार्थिनी समृद्धी रवींद्र खरतडे हिची निवड करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास व्हावा म्हणून लोकमत संस्काराचे मोती हा उपक्रम राबविला जातो. ही स्पर्धा १ जुलै ते १० आॅक्टोबर या शंभर दिवसाच्या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यातील विजेत्या विद्यार्थ्यांना लोकमत परिवारातर्फे बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेत जिल्हानिहाय विद्यार्थ्यांची नागपूर-दिल्ली-नागपूर हवाई सफरसाठी निवड करण्यात येणार होती. यात आर्णी येथील समृद्धी खरतडे हिची निवड करण्यात आली. ही हवाई सफर एक दिवसाची असून मंगळवार २६ जून रोजी ती विमानाने प्रवास करणार आहे.
हवाई सफरसाठी निवड झाल्याबद्दल शाळेकडून गौरव करण्यात आला. यावेळी आर्णीच्या नगराध्यक्ष अर्चना मंगाम, व्यवस्थापक क्रांती प्रवीण मॅकवान, मुख्याध्यापिका दीपाली ठाकरे, समृद्धीचे वडील रवींद्र खरतडे उपस्थित होते. ती आर्णी येथून नागपूरकडे रवाना झाली असून दिल्ली येथे उपराष्टÑपती व्यंकया नायडू यांची भेट घेऊन संवाद साधणार आहे.