आर्णीच्या महिलांची नगरपरिषदेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:55 PM2018-08-29T23:55:50+5:302018-08-29T23:56:03+5:30

शहरातील विविध भागात अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहे. धड रस्ते नाही, सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाही. यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे.

Arnie's women strike on the municipal council | आर्णीच्या महिलांची नगरपरिषदेवर धडक

आर्णीच्या महिलांची नगरपरिषदेवर धडक

Next
ठळक मुद्देविविध समस्या : नगराध्यक्ष, सीओंवर सरबत्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : शहरातील विविध भागात अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहे. धड रस्ते नाही, सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाही. यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे. संतापलेल्या महिलांनी बुधवारी थेट पालिकेवर धडक देत नगराध्यक्ष आणि सीओंवर प्रश्नांची सरबत्ती केली.
शहरातील ग्रीन पार्क, ड्रिमलँड सिटी, बालाजीनगर, नंदनवन कॉलनी, समर्थनगर आदी परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, नाल्यांची समस्या कायम आहे. वीज वितरणचे खांब पडलेले आहे. मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. पालिकेच्या कचरा गाड्याही येत नाही. यामुळे संतापलेल्या महिलांनी बुधवारी नगरपरिषदेवर धडक देत नगराध्यक्ष अर्चना मंगाम यांना विविध समस्यांचे निवेदन दिले. समस्या सुटेपर्यंत त्यांच्या कक्षातून उठणार नाही, असा दम भरला. या महिलांची समजूत काढताना नगराध्यक्षांची तारांबळ उडाली होती.
रंजना ढाकुलकर, सारिका गडवाले, वीणा पांडे, संध्या बोंडगे, अरुणा नाईक, मनीषा चौधरी, माधुरी वानखडे, सुमन मनवर, अवंतिका हेमके, विद्या तायडे, सुवर्णा चव्हाण, वर्षा गवळे, जयश्री घुगे, कविता जगताप, वंदना मुंजेवार, ज्ञानेश्वरी भवनपुरे, जनाबाई काळे, नीता राठोड, सविता पवार यांच्यासह महिलांनी नगराध्यक्षांवर प्रश्नांची सरबत्ती केली. अनेकदा निवेदन देवूनही सुविधा होत नसल्याने संताप व्यक्त केला.
लवकरच कामांना सुरुवात
नगराध्यक्ष अर्चना मंगाम यांनी या परिसरातील समस्यांबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच कामाला सुरुवात होईल, अशी ग्वाही महिलांना दिली. त्यांनी महिलांसोबत थेट परिसर गाठून समस्यांची पाहणीही केली. यामुळे महिलांनी नमते घेत पालिकेतून माघार घेतली.

तात्पुरता उपाय म्हणून रस्त्यावर मुरूम, चुरी टाकण्यात येईल. नाल्या, रस्त्यासाठी प्रस्ताव तयार करून प्रशासकीय मान्यता घेतली जाईल.
- अर्चना मंगाम
नगराध्यक्ष, आर्णी

इस्टिमेट तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविले आहे. मंजुरी मिळताच विकास कामांना सुरुवात केली जाईल.
- करणकुमार चव्हाण
मुख्याधिकारी, आर्णी

Web Title: Arnie's women strike on the municipal council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.