आर्णीत चार गणात काँग्रेस, दोनमध्ये सेना
By admin | Published: February 25, 2017 01:05 AM2017-02-25T01:05:11+5:302017-02-25T01:05:11+5:30
तालुक्यात पंचायत समिती निवडणुकीसाठी चार गण होते. त्यापैकी चार गणात काँग्रेस तर दोन गणात भाजपाने बाजी मारली आहे.
भाजपाला दोन गटात यश : पंचायत समिती निवडणूक
राजेश कुशवाह आर्णी
तालुक्यात पंचायत समिती निवडणुकीसाठी चार गण होते. त्यापैकी चार गणात काँग्रेस तर दोन गणात भाजपाने बाजी मारली आहे. सेनेलाही दोन ठिकाणी यश मिळाले आहे, तर राष्ट्रवादीचा पूर्णपणे सफाया झाल्याचे चित्र आहे.
आर्णी तालुक्यात यावेळी चार गणात काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. देऊरवाडीमध्ये काँग्रेसच्या सविता राठोड यांनी राष्ट्रवादीच्या संगीता राठोड यांचा पराभव केला. या ठिकाणची लढत ही अतिशय चुरशीची ठरली. तसेच सुकळी गणात सेनेचे श्रीकांत ऊर्फ रवी राठोड यांनी राजेंद्र राठोड यांचा ४३८ मतांनी पराभव केला.
बोरगाव गणात पपिता भाकरे यांनी काँग्रेसच्या विशाखा राठोड यांचा पराभव केला. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी संतोष भाकरे यांनी या गणाचे प्रतिनिधित्व केले आहे. भंडारी गणात काँग्रेसच्या ज्योती उपाध्ये विजयी ठरल्या. त्यांनी वीणा राठोड यांचा ४१० मतांनी पराभव केला. सावळी गणात भाजपाच्या प्रियतमा बनसोड यांना २८३५ मते पडली तर त्यांच्या विरोधातील वनिता रामटेके यांना २३५२ मते पडली. २८३ मतांनी भाजपाच्या प्रियतमा बनसोड यांनी बाजी मारली. इचोरा गणात सूर्यकांत जयस्वाल यांनी २१८९ मते घेतली. त्यांनी या ठिकाणी राजीव राठोड यांचा पराभव केला. जवळा गणात अनुपकुमार जाधव यांनी विनोद पंचभाई यांचा ३८६ मतांनी पराभव केला आहे. लोणी गटात काँग्रेसचे विलास अगलधरे हे विजयी ठरले. त्यांनी शिवाजी पारधी यांचा या ठिकाणी पराभव केला. चार गणात काँग्रेसला तालुक्यात यश मिळाले. भाजपा दोन व शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र पंचायत समिती गणात खातेही उघडू शकले नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांच्या मार्गदर्शनात साजीद बेग, आरिज बेग, विलास राऊत आदींसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध प्रचार केल्याने काँग्रेसला काही प्रमाणात का होईना आर्णी तालुक्यात यश प्राप्त झाल्याचे दिसून आले. त्या तुलनेत इतर पक्षांच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष दिले नाही. उल्लेखनिय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रसकडून आवश्यक असा प्रचार झाला नाही.