गैरसोय टाळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:32 AM2021-04-29T04:32:31+5:302021-04-29T04:32:31+5:30
नगरसेवक शहा यांनी उपजिल्हा रुग्णालयासह सर्वच खासगी कोविड केंद्राला भेटी दिल्या. त्यावेळी पॉझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईक अक्षरशः दिवसभर हॉस्पिटलबाहेर ...
नगरसेवक शहा यांनी उपजिल्हा रुग्णालयासह सर्वच खासगी कोविड केंद्राला भेटी दिल्या. त्यावेळी पॉझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईक अक्षरशः दिवसभर हॉस्पिटलबाहेर रस्त्यावर भटकताना आढळले. त्यांच्यासाठी आरामाची व्यवस्था खासगी किंवा उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना दिवसभर हॉस्पिटलच्या आजूबाजूला फिरणे, गाडीमध्येच आराम करणे, एवढेच नव्हे तर रस्त्यावरच रात्र काढावी लागत आहे.
ही विदारक स्थिती शहरात पहावयास मिळत आहे. त्यामुळे कोरोनाच्या लढाईत नगरपालिकेचाही सहभाग असावा, यादृष्टीने नगरपरिषदेच्या हिंदी हायस्कूलची शाळा तसेच मोतीनगरमधील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची इमारत राहण्यासाठी उपलब्ध करून दिल्यास रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळू शकतो. त्यांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते. नगरपालिकेने व्यवस्था केल्यास धनंजय सोनी यांनी उपलब्ध करून दिलेल्या इमारतीच्या ठिकाणी कुलर, चटईची व्यवस्था करून देण्याची तयारी दर्शविली आहे.
,