शिष्यवृत्ती घोटाळेबाजांना अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 11:15 PM2018-03-15T23:15:48+5:302018-03-15T23:15:48+5:30

मागासवर्ग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर डल्ला मारणाऱ्या भ्रष्टाचाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघाच्या सम्यक विद्यार्थी चळवळीने मोर्चा काढून निषेध नोंदविला. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.

Arrest scholarships scamers | शिष्यवृत्ती घोटाळेबाजांना अटक करा

शिष्यवृत्ती घोटाळेबाजांना अटक करा

Next
ठळक मुद्देभारिप-बहुजन महासंघ : सम्यक विद्यार्थी चळवळीचा मोर्चा

ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : मागासवर्ग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर डल्ला मारणाऱ्या भ्रष्टाचाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघाच्या सम्यक विद्यार्थी चळवळीने मोर्चा काढून निषेध नोंदविला. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.
राज्यभरातील मागासवर्ग विद्यार्थ्यांची १८६८ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती भ्रष्टाचाºयांनी गिळंकृत केली आहे. त्याची झळ विद्यार्थ्यांना पोहोचत आहे. शिष्यवृत्ती न मिळल्याने शाळा-महाविद्यालये विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहे. यामुळे मागास विद्यार्थी नाहक पिळला जात आहे, असे मत विद्यार्थ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे नोंदविले. अनुसूचित जाती, ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या उत्पन्नाची अट पाच लाखापर्यंत वाढविण्यात यावी, निर्वाह भत्ता १५०० रुपये करण्यात यावा यासह विविध मागण्याचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले.
निवेदन सादर करताना भारिप- बमसंचे अ‍ॅड. संजीवकुमार इंगळे, विशाल पोले, ईश्वर तायडे, प्रसन्नजीत भवरे, राजू तलवारे, कुंदन नगराळे, केशव भागवत यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Web Title: Arrest scholarships scamers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.