विदर्भात होणार कृत्रिम पावसाचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 03:48 PM2019-07-23T15:48:37+5:302019-07-23T15:49:48+5:30

पावसाअभावी मराठवाड्यासोबतच विदर्भाची स्थिती गंभीर झाली आहे. खरिपातील पिके संकटात सापडली आहे. यामुळे विदर्भात आता कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे.

Artificial rain experiment to be held in Vidarbha | विदर्भात होणार कृत्रिम पावसाचा प्रयोग

विदर्भात होणार कृत्रिम पावसाचा प्रयोग

Next
ठळक मुद्देनागपूरवरून डाफलर रडार सुटणार४०० किलोमीटर अंतरापर्यंत कार्यक्षेत्र निर्धारित

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पावसाअभावी मराठवाड्यासोबतच विदर्भाची स्थिती गंभीर झाली आहे. खरिपातील पिके संकटात सापडली आहे. यामुळे विदर्भात आता कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. त्याकरिता नागपूर विमानतळावरून डाफलर रडार सोडण्याची तयारी सुरू झाली आहे. या रडारवरून ४०० किलोमीटर कार्यक्षेत्रात अचूक मारा करून कृत्रिम पाऊस पाडला जाणार आहे.
गेल्यावर्षीपासून मराठवाडा आणि विदर्भात पावसाची स्थिती चिंताजनक आहे. यंदा तर पावसाने दडी मारल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील दुष्काळी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. हा पाऊस ११ इंचापर्यंत खाली मुरला आहे. यानंतरही जलप्रकल्प तळाला गेले आहे. विदर्भाकडेही मान्सूनने पाठ फिरविली आहे. परिणामी पेरण्या खोळंबल्या. जलाशयातील पाणी पातळीही खाली गेली आहे. विदर्भात कुठेच मान्सूनचा जोर नाही. मान्सून सक्रिय नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याची कबुली हवामन विभागाच्या संचालकांनी दिली आहे.
पावसाने दडी मारल्याने विदर्भात पिकांची स्थिती चिंताजनक बनली आहे. त्यामुळे आता अखेरचा पर्याय म्हणून कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात अथवा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी दिली. त्या दृष्टीने कृत्रिम पावसासाठी डाफलर रडार नागपूर विमानतळावर सज्ज ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून ४०० किलोमीटर परिघात पाण्याच्या उपलब्धतेचा ढग दिसताच कॅल्शीयम क्लोराईडची फवारणी करून पाऊस पाडला जाणार आहे. यामुळे विदर्भातील दुष्काळी तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात मदत होणार आहे. पिकांनाही त्याचा लाभ कृषी क्षेत्रालाही मोठा आधार मिळणार आहे. दरम्यान, पावसाअभावी पेरणी न झालेल्या क्षेत्रात कृत्रिम पाऊस बरसल्यानंतर अथवा दुबार पेरणी करावयाची असल्यास तूर किंवा मका या पिकांचीच लागवड करावी लागणार आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाने या दोन्ही बियाण्यांची मागणी नोंदविली आहे.

नागपूर, सोलापूर आणि औरंगाबाद
कृत्रिम पावसासाठी नागपूर, सोलापूर आणि औरंगाबाद या तीन केंद्रांवर डाफलर रडार सज्ज ठेवण्यात आले आहे. तेथून पाऊस नसणाऱ्या भागात पाऊस पाडता येणार आहे. तत्पूर्वी आयएमडीच्या अधिकाऱ्यांशी कृषीमंत्र्यांनी चर्चा केली आहे.

विदर्भात मान्सून सक्रिय नाही. तूर्तास पाऊस पडण्याची शक्यता दिसत नाही. अशा स्थितीत कुठल्या भागात कृत्रिम पाऊस पाडायचा, याबाबतचा निर्णय शासनाचा असेल. शासनाच्या सूचनेनुसार कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाईल.
- ए.के.श्रीवास्तव
संचालक, हवामान विभाग प्रमुख, पुणे

Web Title: Artificial rain experiment to be held in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस