अरुणावती प्रकल्प ९८ टक्के भरला , धरणाचे ३ दरवाजे १० सेंटिमीटरने उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 12:27 PM2020-09-13T12:27:55+5:302020-09-13T12:28:16+5:30

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस गावानजीकचे अरुणावती प्रकल्प ९८ टक्के भरला आहे . यामुळे धरणाचे ३ दरवाजे १० सेंटिमीटरने उघडले आहेत.

The Arunavati project was 98 percent full, 3 gates of the dam opened by 10 cm | अरुणावती प्रकल्प ९८ टक्के भरला , धरणाचे ३ दरवाजे १० सेंटिमीटरने उघडले

अरुणावती प्रकल्प ९८ टक्के भरला , धरणाचे ३ दरवाजे १० सेंटिमीटरने उघडले

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील दिग्रस गावानजीकचे अरुणावती प्रकल्प ९८ टक्के भरला आहे . यामुळे धरणाचे ३ दरवाजे १० सेंटिमीटरने उघडले आहेत. एकूण ३६ क्यूसेक्सचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. याबाबत प्रशासनानी अरुणावती नदीच्या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे .
गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. धरण प्रवण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने अरुणावती प्रकल्प ९८ टक्के भरला आहे . यंदा वरुणराजाने यवतमाळ जिल्ह्यावर कृपा केली आहे . जिल्ह्यात आत्तापर्यंत पडणाऱ्या पावसाच्या सरासरी पैकी एकूण ९० % पाऊस पडला आहे . यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्व धरण ओव्हर फ्लो झाली आहेत .यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे .

Web Title: The Arunavati project was 98 percent full, 3 gates of the dam opened by 10 cm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण