अरविंद सकरगे मृत्यूचा तपास पोलिसांसमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:42 AM2021-03-05T04:42:16+5:302021-03-05T04:42:16+5:30
रविवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान तो घरी आला होता. पुन्हा बाहेर गेला तो आलाच नाही, अशी प्राथमिक माहिती आहे. ...
रविवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान तो घरी आला होता. पुन्हा बाहेर गेला तो आलाच नाही, अशी प्राथमिक माहिती आहे.
अरविंद छोटासा व्यवसाय करायचा. दरम्यान, तो व्यसनाच्या आहारी गेला. मात्र, त्याचे कुणाशीही वैरत्व नव्हते, असे अनेक जण सांगतात. अचानक त्याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्यामुळे शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी महागाव पोलिसांच्या भरवशावर न राहता आपले स्वतःचे नेटवर्क कामी लावलेले आहे. दोन दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तपासात मेहनत घेत आहे. परंतु अद्याप मृत्यूमागील गूढ उकलता आले नाही.
बुधवारी शवविच्छेदन करण्यात आले. डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल, मृतदेह आढळलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत त्यांच्यासोबत असलेल्या मित्राचे बयाण, मोबाईल कॉल डिटेक्शन, यावर सध्या पोलिसांनी तपास केंद्रित केला आहे. शहरात आत्महत्येचा देखावा करून हत्या करण्याचे प्रकार वाढीला लागले आहे. शहरातील क्रीडांगण, बसस्थानकाची जागा गुन्हेगारांसाठी नंदनवन ठरत आहे. या दोन्ही ठिकाणी पोलिसांची कोणतीही गस्त राहत नाही. त्याचाच फायदा कट-कारस्थान शिजवण्यासाठी केला जात आहे.