आसेगाव देवीतील कृषिपंप चोरांच्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 09:52 PM2018-12-09T21:52:58+5:302018-12-09T21:53:33+5:30

बाभूळगाव तालुक्याच्या आसेगाव (देवी) येथील कृषिपंप चोरांच्या पाच सदस्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यवतमाळच्या कॉटन मार्केट चौकात या चोरीतील मोटारची विक्री करताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

Asegaon Devi farmpump thieves expose the gang | आसेगाव देवीतील कृषिपंप चोरांच्या टोळीचा पर्दाफाश

आसेगाव देवीतील कृषिपंप चोरांच्या टोळीचा पर्दाफाश

Next
ठळक मुद्देपाच आरोपींना अटक : सहा कृषिपंपासह शेतकी साहित्य जप्त, नऊ गुन्हे उघड

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बाभूळगाव तालुक्याच्या आसेगाव (देवी) येथील कृषिपंप चोरांच्या पाच सदस्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यवतमाळच्या कॉटन मार्केट चौकात या चोरीतील मोटारची विक्री करताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
शेख साकीब शेख खालिद, प्रशांत सुरेश पुसदकर, वैभव गजानन पुसदकर, कुणाल संतोष उडाखे व सौरभ वासुदेव वाघमारे सर्व रा.आसेगाव (देवी) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून व घरझडतीतून सहा सबमर्सिबल पंप व इलेक्ट्रिक मोटारी, ३२ नग पितळी स्प्रिंकलर पाईपचे नोझल, चार चाकी वाहनाचे पाच टायर डिस्कसह, गुन्ह्यात वापरलेली ओमनी कार (एम.एच.३१/सीएस-१५८१) आणि दोन मोटरसायकली (एम.एच.२९/ झेड-६८४०, एम.एच.२९/एसी-१०९८) असा तीन लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या पाच आरोपींनी बाभूळगावच नव्हे तर यवतमाळ ग्रामीण व येथील अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही गुन्हे केले असून तूर्त नऊ गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे. या टोळीत आणखी कोण सदस्य आहेत, त्यांनी कुणा-कुणाला चोरीतील साहित्य विकले, आणखी कुठे-कुठे गुन्हे केले याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी घेत आहेत.
यवतमाळ ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात या पाचही आरोपींना देण्यात आले. त्यांची पोलीस कोठडी मिळविण्यात येत आहे. त्यांच्याकडून जिल्हाभरातील अनेक कृषीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी यांनी वर्तविली आहे. यवतमाळच्या कॉटन मार्केट चौकात दोन मोटरसायकलवर युवक संशयास्पदरित्या फिरत असून विद्युत पंपांची विक्री करीत असल्याची टीप पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर यांना मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले असता हा प्रकार खरा होता. लगेच त्या विक्रेत्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते कृषिपंप चोरांच्या टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनात भोयर यांनी या टोळीचा छडा लावला. या पोलीस पथकात सहायक फौजदार भीमराव शिरसाट, गजानन डोंगरे, सुशील झोडगेकर, सुधीर पिदुरकर, किशोर झेंडेकर, चालक विवेक पेठे या पोलीस कर्मचाºयांचा समावेश आहे.

Web Title: Asegaon Devi farmpump thieves expose the gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.