यवतमाळ जिल्ह्यातील आशा सेविकांना जानेवारीपासून मानधन नाही; काळ्या फिती लावून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:51 PM2020-05-11T12:51:06+5:302020-05-11T12:51:32+5:30

कोरोना संदर्भात गावोगावी सर्वेक्षण करण्याचे जोखमीचे काम आशा सेविकांवर लादण्यात आले आहे. केवळ मासिक तीन हजार रुपयात राबणाऱ्या या फ्रन्टलाईन वॉरियर महिलांना शासनाने चक्क जानेवारीपासून मानधन अदा केलेले नाही.

Asha Seviks in Yavatmal district have not received honorarium since January; Movement with black ribbons | यवतमाळ जिल्ह्यातील आशा सेविकांना जानेवारीपासून मानधन नाही; काळ्या फिती लावून आंदोलन

यवतमाळ जिल्ह्यातील आशा सेविकांना जानेवारीपासून मानधन नाही; काळ्या फिती लावून आंदोलन

Next
ठळक मुद्देजीव धोक्यात घालणाऱ्या फ्रन्टलाईन वॉरियर्सवर अन्याय

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना संदर्भात गावोगावी सर्वेक्षण करण्याचे जोखमीचे काम आशा सेविकांवर लादण्यात आले आहे. केवळ मासिक तीन हजार रुपयात राबणाऱ्या या फ्रन्टलाईन वॉरियर महिलांना शासनाने चक्क जानेवारीपासून मानधन अदा केलेले नाही. तर मानधन वाढीची अधिवेशनात घोषणा करूनही वाढ लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात आशा सेविकांनी सोमवारपासून काळ्याफिती लावून कोरोना सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. या माध्यमातून शासनाचा निषेध करतानाही आशा सेविकांनी जबाबदारी मात्र झटकलेली नाही.

Web Title: Asha Seviks in Yavatmal district have not received honorarium since January; Movement with black ribbons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार