एएसआय हरणखेडे यांना राष्ट्रपती पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 09:41 PM2019-08-14T21:41:10+5:302019-08-14T21:42:26+5:30

जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले सुनील हरणखेडे यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. हरणखेडे हे पोलीस मुख्यालयात कवायत निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांचा पदक जाहीर झाल्याबद्दल गौरव केला जाणार आहे.

ASI Harnakhede Presidential Medal | एएसआय हरणखेडे यांना राष्ट्रपती पदक

एएसआय हरणखेडे यांना राष्ट्रपती पदक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले सुनील हरणखेडे यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. हरणखेडे हे पोलीस मुख्यालयात कवायत निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांचा पदक जाहीर झाल्याबद्दल गौरव केला जाणार आहे.
राज्यातील पाच पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांंना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. यामध्ये यवतमाळातील सहायक फौजदार सुनील गणपतराव हरणखेडे यांची निवड झाली आहे. हरणखेडे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांतर्फे स्वातंत्र्य दिनी सत्कार केला जाणार आहे.
पोलीस सेवेत सातत्य कायम ठेवत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निवडक अधिकारी-कर्मचाऱ्यांची राष्ट्रपती पोलीस पदकासाठी निवड केली जाते. यामध्ये यवतमाळातील सुनील हरणखेडे यांची निवड सर्वांसाठीच गौरवास्पद मानली जात आहे.

Web Title: ASI Harnakhede Presidential Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस