ओल्या दुष्काळासाठी शासनाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:46 AM2021-09-27T04:46:07+5:302021-09-27T04:46:07+5:30
आर्णी : तालुक्यातील प्रत्येक गावात मागील १५ दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ...
आर्णी : तालुक्यातील प्रत्येक गावात मागील १५ दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
अति पावसामुळे शेतातील कापसाची बोंडे सडत आहेत. सोयाबीनला कोंब फुटत आहे. तुरीचेही नुकसान झाले आहे. मागील ३ वर्षांपासून सततची नापिकी असल्याने बळीराजा हतबल झाला आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. विमा कंपनीने प्रत्येक शिवाराचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल, या उद्देशाने शासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावे, असे निवेदन विठ्ठल देशमुख, दिगांबर बुटले, प्रवीण मुदलवार, विजय ढाले, विलास वातिले, लक्ष्मण पठाडे, रवींद्र नालमवार, सुनील पद्मावार आदींनी नायब तहसीलदार संतोष गजभिये यांना दिले.