नाव, गाव विचारले.., अंगझडती घेताच निघाला देशी कट्टा; गुन्हा दाखल

By विशाल सोनटक्के | Published: October 12, 2023 06:23 PM2023-10-12T18:23:06+5:302023-10-12T18:23:59+5:30

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला डोर्ली रोडवर दोघेजण संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची माहिती मिळाली

Asked the name, village, as soon as the body was searched, the native katta left | नाव, गाव विचारले.., अंगझडती घेताच निघाला देशी कट्टा; गुन्हा दाखल

नाव, गाव विचारले.., अंगझडती घेताच निघाला देशी कट्टा; गुन्हा दाखल

यवतमाळ : शहरातील आंबेडकर चौक ते डोर्ली रोड दरम्यान नगरपरिषदेच्या स्वच्छतागृहाशेजारी दोघेजण संशयास्पद स्थितीत फिरताना आढळले. पोलिस पथकाने ताब्यात घेवून त्यांना नाव, गाव विचारले, उडवाउडवीची उत्तरे मिळताच पथकाने त्यांची अंगझडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे देशीकट्टा आढळला. या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला डोर्ली रोडवर दोघेजण संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची माहिती मिळाली. या दोघांकडे घातक हत्यारे असल्याचेही समजल्याने पथकाने डोर्ली रोडकडे धाव घेतली. तेथे स्वच्छागृहाजवळ दोघेजण उभे असल्याचे आढळले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता एकाने सिद्धार्थ वासुदेव गायकवाड (३०) रा. सेवानगर यवतमाळ तर दुसऱ्याने लखन उर्फ जानी विजय चंदेल (२८) रा. सेवानगर यवतमाळ असे सांगितले. दोघांची अंगझडती घेतली असता सिद्धार्थ याच्याकडे देशी बनावटीच्या मॅग्झीनला काळ्या रंगाचे फायबर कव्हर असलेली पिस्टल आढळून आली. तर चंदेल याच्या खिशामध्ये एक जीवंत काडतूस सापडले. पोलिसांनी ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ व कलम १३५ महाराष्ट्र पोलिस कायदा अन्वये यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.


 

Web Title: Asked the name, village, as soon as the body was searched, the native katta left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.