शेतकºयांवर अस्मानी व सुलतानी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:28 PM2017-10-29T22:28:34+5:302017-10-29T22:28:50+5:30

‘जीवाची करायची असेल माती, त्यातनेच करावी शेती’, अशी अवस्था शेती व्यवसायाची झाली आहे. शेती व्यवसाय हा आता आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे.

Assamese and Sultani crisis on farmers | शेतकºयांवर अस्मानी व सुलतानी संकट

शेतकºयांवर अस्मानी व सुलतानी संकट

googlenewsNext
ठळक मुद्दे शेतीव्यवसायच धोक्यात : एका मागून एक आंदोलनांची साखळी

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : ‘जीवाची करायची असेल माती, त्यातनेच करावी शेती’, अशी अवस्था शेती व्यवसायाची झाली आहे. शेती व्यवसाय हा आता आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे. निसर्ग पिकू देत नाही आणि शासन पिकलेला विकू देत नाही. त्यामुळे शेतकरी आता अस्मानी व सुलतानी अशा दोन्ही संकटांना तोंड देत नाईलाजाने शेती व्यवसाय करीत आहे. वणी परिसरात मागील दोन महिन्यापासून शासनाशी लढा देण्यासाठी कोठे ना कोठे असंघटीत आंदोलन करीत आहे.
कृषी प्रधान म्हणून मिरविणाºया देशात शेती व्यवसाय नापसंतीला उतरला आहे. उत्तम नोकरी-मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती असा व्यवसायाचा उलटा क्रम येण्याला कारणीभूत कोण, यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकरी नको रे बाप्पा शेतीचा व्यवसाय म्हणून आपली शेती मक्त्याने देण्याच्या मानसीकतेत आले आहे, कधी अतिवृष्टीने तर कधी पावसाअभावीव शेतीवर दुष्काळाची वेळ येते, हे अस्मानी संकट शेतकºयांच्या पाचविलाच पुजलेले असते, तर एखादे वर्षी निसर्गाने साथ दिली, तर उत्पन्न वाढलेले दिसते पण शासनाकडून शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळत नाही. हे सुलतानी संकट शेतकºयांच्या मानगुटीवर असतेच. शेतकºयांच्या हतबलतेचा आधार घेऊन विरोधी पक्षाकडून शासनाच्या या सुलतानशाहीवर तोंडसुख घेण्याची संधी विरोधक सोडत नाही. मात्र हेच बोंबा मारणारे नेते शासनाच्या राजगादीवर स्वार झाले की शेतकºयांच्या यातना विसरून जातात, याचा अनुभव शेतकरी घेत आहे. विरोधात असताना कापसाला सात हजार रूपये व सोयाबीनला पाच हजार रूपये भाव मागणारे आता सत्तेवर असूनही भाव का देऊ शकत नाही, याचे उत्तर शेतकºयांनाही शोधता आले नाही. शेतीत काम करणारे मजुरही आता मिळेनासे झाले आहे. त्यामुळे मानवनिर्मीत हे तिसरे संकट अलीकडे शेतकºयांना त्रासून सोडत आहे. त्यात वाघाची दहशत मजुरांना शेती कामाकडे वळू न देण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
जंगलातील रोही व रानडुकरांचे कळप शेतकºयांच्या उभ्या पिकांचा फडशा पाडत आहे. या जंगली प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा म्हणून अनेक गावातील शेतकºयांनी गावोगावी उपोषण सुरू केले होते. वनमंत्र्याने शेतकºयांना आश्वासन देऊन त्यांची बोळवण केली. शेतकºयांना शेतीला कुंपन करण्यासाठी अनुदानावर मदत पुरविल्याशिवाय या संकटातून शेतकरी मुक्त होणार नाही. आता परतीच्या पावसाने कापूस पिकावर संकट आणले. कापसाची बोंडे सडून जमिनीवर सडा पडला. काही बोंडे झाडालाच काळी पडली. शिल्लक राहिलेल्या बोंडावर अळींनी एवढे आक्रमण केले आहे, की बोंडातून कापसाऐवजी गुलाबी अळ्या निघत आहे. या नुकसानीची पाहणी करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी म्हणून ब्राम्हणी व निळापूरचे शेतकरी गावातच उपोषणाला बसले आहे. त्यांच्याकडे शासनाचे अजूनही लक्ष गेले नाही.

भाववाढीची मागणी
शासन कर्मचाºयांचा महागाई भत्ता वर्षातून दोनवेळा वाढविले. खासदार-आमदार यांचे वेतन व भत्ते बिना आंदोलनाने झटक्यात वाढविते. तर मग शेतकºयांच्या शेतमालाचे हमी भाव मागणी असूनही का वाढविले जात नाही. हा शेतकºयांचा सवाल आहे. महागाईची झळ शेतकºयांना बसत नाही काय, याचे उत्तर शासनाने द्यावे म्हणजे झाले.

Web Title: Assamese and Sultani crisis on farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.