अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे तातडीने करा; नुकसानग्रस्तांची मानसिकता समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 05:39 PM2024-09-09T17:39:46+5:302024-09-09T17:43:10+5:30

Nagpur : आढावा बैठकीत आमदार नामदेव ससाणे यांचे यंत्रणेला निर्देश

Assess flood damage promptly; Understand the mentality of the victims | अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे तातडीने करा; नुकसानग्रस्तांची मानसिकता समजून घ्या

Assess flood damage promptly; Understand the mentality of the victims

लोकमत न्यूज नेटवर्क 
उमरखेड :
उमरखेड व महागाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कोरटा, चिखली व दराटी येथील घरे पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले आहे. या पाश्वभूमीवर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात आढावा बैठक पार पडली. यावेळी घरासह शेतीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात यावे, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देऊ नका, असे निर्देश आमदार नामदेव ससाणे यांनी यंत्रणेला दिले.


अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पाणी शिरल्याने घरांची पडझड झाली आहे. सर्वेक्षण करतेवेळी शेतकऱ्यांसह नुकसानग्रस्तांची मानसिकता समजून घ्या. त्यांना दिलासा द्या, असे आवाहन करण्यात आले. उमरखेड तालुक्यात ६५ हजार ५१० हेक्टर पेरणीची नोंद असून, २५ हजार ५२१ हेक्टरमधील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातली दळणवळण व्यवस्था पावसात खराब झालेल्या रस्त्यामुळे थांबायला नको, यासाठी रस्ता दुरुस्तीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. पुरापासून धोका निर्माण झालेल्या गावात आरोग्याच्या दृष्टीने गावागावात फवारणी करा, अशा सूचना करून सिंचन विभागातील अधिकाऱ्यांना प्रत्येक नुकसानग्रस्त गावातील नाल्यावर संरक्षक भिंतीसाठी अहवाल पाठविण्याचे सांगितले. या बैठकीला उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, उमरखेड व महागाव तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपकार्यकारी अभियंता सा.बां. विभाग जि.प. बांधकाम विभाग क्र. २. उपकार्यकारी अभियंता मराविमं, उपकार्यकारी अभियंता जलजीवन मिशन, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यांसह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


वीज वितरणच्या अभियंत्याला धारेवर धरले
शांतता समितीच्या बैठकीला गैरहजर असणारे वीज वितरणचे अभियंता जैन हे आढावा बैठक संपत असताना आले. उत्सव काळात रात्रीच्या वेळी वीज गायब होते. महिनाभरापासून प्रत्येक दहा मिनिटांत तीन वेळा वीज ट्रिप होते. वीज वितरणने उमरखेड शहराला वाऱ्यावर सोडल्याने आमदार ससाणे यांनी अभियंत्यांना धारेवर धरले. शहर आधीच संवेदनशील आहे. उत्सवाच्या काळात बत्ती गुल व्हायला नको, असे निर्देश देण्यात आले.

Web Title: Assess flood damage promptly; Understand the mentality of the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.