धक्कादायक! पोलीस ठाण्यातच सहाय्यक फौजदाराची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 10:15 AM2020-03-07T10:15:15+5:302020-03-07T10:17:48+5:30

पोलीस उपनिरीक्षकाच्या आत्महत्येनं जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ

assistant police sub inspector commits suicide in yavatmal police station kkg | धक्कादायक! पोलीस ठाण्यातच सहाय्यक फौजदाराची आत्महत्या

धक्कादायक! पोलीस ठाण्यातच सहाय्यक फौजदाराची आत्महत्या

googlenewsNext

यवतमाळ: शहर पोलीस ठाण्याच्या डीबी रुममध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ निर्माण झाली आहे. राजू उईके असे या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते लगतच्या वाघापूर येथील रहिवासी आहे. 

एएसआय राजू रात्री गस्तीवर होते. एक वाजेपर्यंत ते ड्युटीवरही होते. दरम्यान रात्री त्यांनी युनिफॉर्मवरच डीबी रुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आज सकाळी पोलीस कर्मचारी तेथे गेले असता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच शहर ठाणेदार धनंजय सायरे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नाही. मात्र जात वैधता प्रमाणपत्रामुळे ते गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते, असे पोलीस कर्मचाऱ्यांच्या चर्चेतून पुढे आले.
 

Web Title: assistant police sub inspector commits suicide in yavatmal police station kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.