‘जेडीआयईटी’चे अथहर खान आचार्य पदवीने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 10:01 PM2017-10-23T22:01:44+5:302017-10-23T22:02:06+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. अथहर रविश खान मुजफ्फर खान यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेत परमाणु व दूरसंचार अभियांत्रिकी विषयात आचार्य पदवी प्रदान केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. अथहर रविश खान मुजफ्फर खान यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेत परमाणु व दूरसंचार अभियांत्रिकी विषयात आचार्य पदवी प्रदान केली आहे.
‘डेव्हलपमेंट आॅफ सस्टेनेबल अल्ट्रावाईड बॅड कम्युनिकेशन सिस्टीम फॉर अंडरग्राऊंड माईन चॅनल’ असा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. यासाठी त्यांना परमाणु व दूरसंचार विभाग प्रमुख डॉ. संजय गुल्हाने यांचे मार्गदर्शन लाभले. याविषयावर त्यांनी वाय-कॉम-१२, शांघाय, चीन येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत, तर नॅशनल कॉन्फरन्स आॅन कम्युनिकेशन आयआयटी बॉम्बे येथे राष्ट्रीय परिषदेत शोधनिबंधाचे सादरीकरण केले आहे. ‘एल्सविअर जर्नल आॅफ डिजिटल कम्युनिकेशन अँड नेटवर्क’ या नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचा शोधनिबंध समाविष्ट करण्यात आला आहे.
प्रा. खान हे जेडीआयईटीमध्ये परमाणु व दूरसंचार अभियांत्रिकी विभागात कार्यरत आहे. आयईटीई, सीएसटीए अमेरिका, आयएसीएसआयटी (सिंगापूर), आयएईएनजी (हाँगकाँग) अशा नामांकित आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते आजीवन सदस्य आहेत. त्यांनी आपले संपूर्ण संशोधन कार्य जेडीआयईटीतील परमाणु व दूरसंचार विभागाच्या मान्यता प्राप्त संशोधन केंद्रातून पार पाडले. ते आपल्या या यशाचे श्रेय आई नसिरा खान, वडील मुजफ्फर खान आदींना देतात. त्यांच्या यशाचे संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर आदींनी कौतुक केले.