सुट्यांमुळे एटीएममध्ये ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 10:10 PM2018-04-30T22:10:15+5:302018-04-30T22:10:35+5:30

बँकांना सलग चार दिवस सुटी आल्याने बँकांचा संपूर्ण आर्थिक भार एटीएमवर आला. एटीएममध्ये पैसे साठविण्याची मर्यादा आहे. यामुळे एटीएमचे चक्र प्रभावित झाले असून पैसे नसल्याने ग्राहकांना एटीएममधून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

At the ATM due to the suspension of settlement | सुट्यांमुळे एटीएममध्ये ठणठणाट

सुट्यांमुळे एटीएममध्ये ठणठणाट

Next
ठळक मुद्देग्राहकांची तोबा गर्दी : केवळ कागदाचे चिटोरे, जिल्ह्यात १८४ एटीएम

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बँकांना सलग चार दिवस सुटी आल्याने बँकांचा संपूर्ण आर्थिक भार एटीएमवर आला. एटीएममध्ये पैसे साठविण्याची मर्यादा आहे. यामुळे एटीएमचे चक्र प्रभावित झाले असून पैसे नसल्याने ग्राहकांना एटीएममधून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
जिल्ह्यात विविध बँकांचे १८४ एटीएम आहेत. यामध्ये सर्वाधिक एटीएम स्टेट बँकेचे आहेत. यासोबत विविध बँकांचे एटीएम आहेत. प्रत्येक एटीएममध्ये १० ते २५ लाख रूपयांपर्यंतची रक्कम साठविता येते. सर्व एटीएम सुरू राहिल्यास हे पैसे दोन ते तीन दिवस पुरतात. वर्दळ वाढल्यास हे सर्वच पैसे अपुरे पडतात. शनिवारपासून बँका बंद आहेत. यामुळे शुक्रवारी टाकलेले पैसे काही एटीएममध्ये शनिवारपर्यंत पुरले, तर बहुतांश एटीएम रविवारी दुपारपर्यंत सुरू होते. दुपारनंतर एटीएममध्ये खडखडाट पहायला मिळाला.
या ठिकाणी येणारा प्रत्येकजण एटीएमपासून रिकाम्या हाताने परत येत होता. यामुळे एटीएममध्ये पैशाच्याच ‘स्लिप’ निघाल्या. पैसे मात्र निघालेच नाही. शहरासह तालुका ठिकाणच्या प्रत्येक एटीएममध्ये नागरिक येरझारा मारतानाचे चित्र पहायला मिळाले. या एटीएममध्ये बुधवारीच पैसे जमा होणार आहे. तोपर्यंत ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
लग्नाचे आंदण उधारीवर देणार कोण?
एप्रिल महिन्यात लग्नाच्या सर्वाधिक तिथी आहेत. दुकानात जाण्यापूर्वी एटीएममधून पैसे काढू, असे म्हणत अनेकांनी वेळेवर एटीएमकडे धाव घेतली. मात्र एटीएममध्ये पैसाच नव्हता. अशावेळी लग्नात दिले जाणारे प्रेझेंट घेण्यासाठी पर्याय म्हणून स्वाईप कार्ड वापरण्याला पसंती दिली गेली. मात्र अनेकांकडे स्वाईप मशिनही नाही. यामुळे अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
एटीएममध्ये सुरक्षा गार्डही दिसेना
पैसे नसल्याने काही एटीएमला ‘कॅश नाही’ असे बोर्ड लावले गेले. काही ठिकाणी पैसे नसतानाही कुठलेही बोर्ड नव्हते. अशा ठिकाणी सुरक्षा गार्ड दिसला नाही. यामुळे संपलेले पैसे कधी येतील, असेही अनेकांना विचारता आले नाही.

Web Title: At the ATM due to the suspension of settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.