माहूर येथे आत्मशांती महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 09:54 PM2018-03-11T21:54:00+5:302018-03-11T21:54:00+5:30
येथील दत्तात्रेय देवदेवेश्वर मंदिराच्या प्रांगणात आत्मशांती महोत्सवाला सुरूवात झाली. या महोत्सवात संत, महंत व भक्तांच्या उपस्थितीत विधीवत प्रारंब झाला.
ऑनलाईन लोकमत
माहूर : येथील दत्तात्रेय देवदेवेश्वर मंदिराच्या प्रांगणात आत्मशांती महोत्सवाला सुरूवात झाली.
या महोत्सवात संत, महंत व भक्तांच्या उपस्थितीत विधीवत प्रारंब झाला. पहिल्या दिवशी न्यायंबास बाबा शास्त्री यांनी मानव व्यर्थ आशा, आकांक्षेमुळे मनात येईल तसे वागतो. त्यामुळे अन्याय, अत्याचारासारख्या घटना सहज घडत असल्याचे प्रवचनातून सांगितले. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अध्यात्मिक विचारसरणीचा प्रचार-प्रसार होणे आवश्यक असून या विचारांनीच मनावर संयम ठेवता येईल, असे स्पष्ट केले. न्यायंबास बाबा पुढे म्हणाले, सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी मानवाने सदाचार, संपन्न जीवन जगावे, तरच त्याचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे व स्वैर वागण्याने त्याचा विनाश निश्चित असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मनावर संयम ठेवावा, थोडाही मनरूपी घोड्याचा लगाम ढिला होऊ देऊ नये, असे आवाहन केले.
उद्घाटकीय सत्रात कवीश्वराचार्य माहूर पीठाधीश मधुकरबाबा शास्त्री यांनी आत्मशांती महोत्सवाचे महत्त्व विषद करून मानव मात्रांच्या कल्याणाचे विचार हे केवळ आध्यात्मिक संत परंपरेतूनच समाजाला मिळत असतात, असे सांगितले. वैराग्यमूर्ती दत्ताबापू यांनी दीप प्रज्वलित करून या महोत्सवाचा शुभारंभ केला. यावेळी गोपीराज शास्त्री, शहागडकर बाबा, कृष्णराज बाबा, योगीराज दादा विद्वांस, मुरलीधर विराट शास्त्री उपस्थित होते. या महोत्सवात अखंड श्री दत्त नामाचा जप, अखंड दंडवत सुरू आहे.